vitthalrao-patil-passes-away-: माजी आमदार विठ्ठलराव पाटील यांचे निधन; फुटबॉलपटू ते आमदार जीवनप्रवास




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : माजी आमदार विठ्ठलराव एन. पाटील यांचे आज सकाळी निधन झाले. विठ्ठलराव पाटील हे माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडील आहेत. 



जठारपेठ मधील निवासस्थानी माजी आमदार विठ्ठलराव उर्फ व्ही. एन. पाटील यांचे आज 18 डिसेंबरला पहाटे 5.30 वाजता दीर्घ आजारानंतर निधन झाले.  त्यांच्या मागे पुत्र डॉ. रणजित, नितीन आणि रणधीरसह मोठा आप्त परिवार आहे. 



व्ही. एन. पाटील हे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते. ज्येष्ठ नेते स्व. नानासाहेब वैराळे यांनी त्यांना अकोला बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात काँग्रेसची उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत व्ही. एन. पाटील बहुमताने विधान परिषद सदस्य आमदार म्हणून निवडून आले होते. 


मृदू स्वभाव असलेले व्ही. एन. पाटील हे पट्टीचे फुटबॉलपटू होते. अनेक फुटबॉल टूर्नामेंट मध्ये त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते. सदैव गोड बोलणारे व्ही. एन. पाटील राजकारणासोबतच क्रीडा क्षेत्रात सक्रिय होते. अलीकडे वार्धक्यामुळे त्यांनी आराम करणे पसंत केले होते. 


माजी आमदार व्ही. एन. पाटील यांच्या निधनाने एक समंजस नेता काळाच्या उदरात गेला आहे, अश्या प्रतिक्रिया राजकिय सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या. त्यांची अंत्ययात्रा आज 18 डिसेंबरला दुपारी त्यांच्या जठारपेठ येथील निवासस्थाना हून निघून उमरी मोक्षधाम मध्ये निघून त्यांचे पार्थिवावर अंत्य संस्कार आले. असे डॉ. रणजित पाटील परिवाराकडून सांगण्यात आले आहे.


                      ........

भारतीय अलंकार न्यूज 24 परिवार कडून माजी आमदार श्री. विठ्ठलराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

मुख्य संपादक 

ॲड. नीलिमा शिंगणे जगड,

अकोला

टिप्पण्या