ustad-zakir-hussain-passaway: पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन; कला विश्वावर शोककळा




ustad zakir hussain passes away:तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. सॅन फ्रान्सिस्को मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी आज रविवार 15 डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. 


file image 

उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह रक्खा कुरेशी आणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीर यांचे वडील तबला वादक होते.


file image 


झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेज मधून पदवीचे शिक्षण घेतले.



झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम 'लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड' लाँच केला. सन 2016 मध्ये त्यांना अमेरिकाचे पूर्व राष्ट्रपति बराक ओबामा यांनी ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट मध्ये सहभागी होण्यास आमंत्रित केले होते. यामध्ये सहभागी होणारे जाकिर हुसैन पहीले भारतीय संगीतकार ठरले. भारतीय शास्त्रीय संगीत  आंतरराष्ट्रियस्तर पोहचविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.


  file image 


जाकिर हुसैन अभिनेता देखील होते. त्यांनी  12 चित्रपटात काम केले आहे. उस्ताद झाकीर हुसेन Ustad Zakir Hussain यांनी शशि कपूर यांच्या सोबत 1983 मधील ब्रिटिश फिल्म 'हीट एंड डस्ट' मध्ये काम केले. ही त्यांची  एक्टिंग डेब्यू फिल्म होती। याशिवाय सन 1998 मध्ये प्रदर्शित फिल्म 'साज' मध्ये दिसले, यामध्ये शबाना आजमी यांनी त्यांच्या प्रेमिकेची भूमिका निभावली होती. अनेक व्यवसायिक जाहिराती मध्ये काम केले. त्यातील ताज महल चहाची टिव्हीवरील जाहिरात प्रचंड गाजली होती. "अरे हुजुर वाह ताज बोलिये" हा त्यांचा या जाहिरात मधील संवाद त्यावेळी घरोघरी म्हंटला जायचा. 



टिप्पण्या