भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: हल्ली मंदिरेही चोरांपासून सुरक्षित नसल्याची बाब अकोला जिल्ह्यातील आगर येथील चोरीच्या दोन घटनांवरून समोर आली आहे. श्रीदत्त जयंतीच्या Shri Datta jayanti पूर्वसंध्येला चोरट्यांनी श्री दत्त मंदिर Shri Datta temple आणि श्री भवानी माता मंदिराला लक्ष करीत दानपेटीवर हात साफ केला. या मंदिरातील दानपेटी वर्षातून एकदाच जयंती दिवशी उघडण्यात येत असल्यामुळे यामधील किती रक्कम चोरीस गेली याचा उलगडा होणे कठीण झाले आहे.
आगर येथील श्री भवानी माता मंदिर आणि श्री दत्त मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
काल शुक्रवारी सायंकाळी दैनंदिन आरती आटोपून मंदिराच्या पुजा-यासह भाविक घरी गेले. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी रात्री मंदिराचे कुलूप तोडून आवारात प्रवेश केला. मुख्य प्रवेश द्वाराचे कुलुप तोडून मंदीरातील गाभाऱ्यातील दानपेटी लंपास केली.
आज सकाळी पुजा-यासह काही भाविक दैनंदिन आरती साठी मंदिरात आले असता, हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे आज श्रीदत्त जयंती उत्सवाची सर्वत्र लगबग सुरू आहे, आणि मंदिरात झालेल्या चोरीमुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
या मंदिरातील दानपेटी वर्षातून एकचदा गावातील भाविकांच्या समक्ष उघडण्यात येते त्यामुळे चोरी किती रुपयांची झाली याबाबत निश्चित आकडा प्राप्त झाला नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून, पुढील तपास आता करीत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा