- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
shivshahi-bus-brakes-failed-: अशोक वाटिका चौकात शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: नादुरुस्त बसेस रस्त्याने धावत असल्याने राज्यात सध्या एस टी बसच्या अपघातात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. अशीच एक नादुरुस्त बस अकोला शहरात धावत असताना अपघात घडला. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानाने पुढील मोठा अनर्थ टळला.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला बसस्थानक मधून निघून अमरावती कडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या MH 09 - 4316 क्रमांकाच्या शिवशाही बसगाडीचे शहरातील अशोक वाटिका चौकात अचानक ब्रेक फेल झाले होते. चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून पुढील अनर्थ टाळला.
घटनेवेळी सुदैवाने या चौकातील सिग्नल बंद होते. त्यामुळे वाहतूक थांबलेली नव्हती. जर रेड सिग्नल असता गाडीने चौकात अनेकांना चिरडले असते. मात्र यावेळी चालकाने समयसूचकता दाखवत गाडीला चौकातील पेट्रोल पम्प परिसराच्या आवार भिंतीला धडक दिल्याने गाडी नियंत्रित होऊन मोठा अपघात टळला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हंटले.
या बसचे चालक मनोज तायडे यांनी प्रसंगावधान राखल्याने आज अकोल्यात अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे या बस चालकाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. या गाडीत एकही प्रवाशी नसल्याचं चालकाने म्हंटल. मात्र या घटनेनी आता बस गाड्यांचा फिटनेसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा