sansi-gang-caught-akl-police: आंतरराज्यीय कुख्यात टोळी सांसी गँग अकोला पोलिसांच्या जाळ्यात



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: तुषार हॉटेल येथील लग्न समारंभ मध्ये झालेली चोरीचा गुन्हा स्थानीक गुन्हे शाखा अकोला कडून उघडकीस आली आहे. चोरीस गेलेले 8 लाख पन्नास हजार रूपयेचे दागिने मध्यप्रदेश राजगड येथील आंतरराज्यीय कुख्यात टोळी सांसी गँग यांचे कडून जप्त कऱण्यात आली आहे.


25 नोव्हेंबर  रोजी फिर्यादी पियूष कुमार बाबुराव वाघमारे (रा. नागपूर) हे त्यांचे लहान भावाचे लग्न समारंभा करीता अकोला येथील तुषार हॉटेल या ठिकाणी आले होते. त्यांची आई यांनी सोन्याचे दागिने असलेली पर्स फोटो काढते वेळी स्टेजच्या बाजुला ठेवली असता, ती सोन्याचे दागिणे आणि नगदी असे एकुण किंमत 9,38,500 चा असलेली पर्स ही कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरून नेली. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन डाबकी रोड, अकोला येथे अपराध नं कलम 425/2024 कलम 305 भा. न्या. सं अन्वेय दाखल असून तपासावर होता.


गुन्हयाचे गांभिर्य पाहता पोलीस अधीक्षक अकोला यांनी या गुन्हयाचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानीक गुन्हे शाखा, अकोलाचे पो.नि  शंकर शेळके यांना आदेशीत केले. पो.नि  शंकर शेळके  यांनी त्याचे अधिनीस्त एक पथक गठीत करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले.  तपास पथकातील अधिकारी आणि अमंलदार यांना त्याचे गोपनिय बातमीदारा मार्फत तथा तांत्रिक विश्लेषाना वरून माहीती झाले की सदर चोरी ही, मध्यप्रदेश राजगड येथील आंतरराज्यीय कुख्यात टोळी सांसी गँग चे लोकांनी केली आहे. अश्या मिळालेल्या माहीती वरून पो.नि शंकर शेळके यांनी तात्काळ तपास पथक हे मध्यप्रदेश येथील राजगड कडे रवाना केले. पथकाने आरोपी नकुल रामकिसन सिसोदीया (रा. ग्राम कडीया सांसी ता. पचोर जि. राजगड) आणि त्याचा सोबती विधी संघर्षित बालक यांचे राहते घरून सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल एकुण किंमत अंदाजे 8,50,000 रूपयेचे हस्तगत करण्यात स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पथकास यश आले. मुद्देमाल पुढील तपास कामी पोलीस स्टेशन डाबकी रोड, अकोला यांचे ताब्यात देण्यात आले आहे.



कारवाई ही पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक  अभय डोंगरे , पो.नि  शंकर शेळके स्थागुशा अकोला, यांचे मार्गदर्शनात सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, माजीद पठाण, पो. अमंलदार अब्दुल माजीद, वसीम शेख, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, भिमराव दिपके, अशोक सोनवने, प्रशांत कमलाकर यांनी केली आहे.

टिप्पण्या