- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
remove-EVM-machines-VBA: ईव्हीएम मशीन हटाव; वंचित बहुजन आघाडीची स्वाक्षरी मोहीम आरंभ, बाळासाहेबांनी केली पहिली स्वाक्षरी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : ईव्हीएम मशीन हटाव करिता वंचित बहुजन आघाडीने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वाक्षरी करून या मोहिमेला सुरुवात केली आहे. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी पहिली स्वाक्षरी करून मोहिमेस आरंभ केला आहे. आज यशवंत भवन येथे या अभियानास प्रारंभ करण्यात आला.
26 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट द्वारे मतदान घेण्यात यावे, अशी याचिका खारीज केली. तर न्यायालयाने ती खारीज केली नाही पाहिजे होती असं आंबेडकरांनी यावेळी म्हटलं. सुप्रीम कोर्टाला कुठली सिस्टीम लागू करावी किंवा लागू करू नये याबाबत अधिकार नसल्याचंही त्यांनी म्हटलं. नोंदणीकृत पक्षांना कुठली सिस्टीम पाहिजे किंवा नाही. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असता तर मी मान्य केलं असत असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांना ईव्हीएम विरोधात देशव्यापी यात्रा काढण्याची अजिबात गरज नसल्याचं आंबेडकर म्हणाले. ईव्हीएम विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असून ईव्हीएमला विरोध न केल्यास देशात हुकूमशाही लागू होईल असं देखील आंबेडकर म्हणाले.
काँग्रेसने 10 डिसेंबर पर्यंत सर्वांना बोलावलं नाही तर आम्ही पुढाकार घेऊ आणि सर्व पक्षांकडे पर्याय ठेऊ असेही आंबेडकर म्हणाले.
तर महापरिनिर्वाण दिनानिम्मित रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट बंद करून मोठा रेव्हेन्यू बुडवीला, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा