- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
public-outcry-meeting-akola: बांगलादेशातील अत्याचाराविरोधात जनआक्रोश सभा; 10 डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाचे आयोजन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
*मंगळवारी 3 तास व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन
*सभा स्थळी तीन मार्गांवर यज्ञाचे आयोजन
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बांगलादेश येथील हिंदूवर होत असलेल्या अनन्वित अत्याचारविरोधात येथील सकल हिंदू समाजाद्वारे मंगळवार, 10 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चौकात जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाने या सभेत मोठ्या संख्येने सहभागी होत हिंदूंवरील अत्याचाराविरोधातील आक्रोश संवैधानिक मार्गाने व्यक्त करावा, असे आवाहन शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत करण्यात आले.
पत्रपरिषदेला सकल हिंदू समाजाचे संयोजक राहुल राठी, प्रा. विवेक बिडवई, गजानन घोंगे, सारंग करे, बजरंग दलाचे सूरज भगेवार उपस्थित होेते.
देशासह जगात मानवाधिकाराच्या गप्पा मारल्या जातात. त्याचवेळी बांगलादेश येथे हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत असताना मानवाधिकारावर बोलणारे गप्प का? मानवाधिकार केवळ राष्ट्रद्रोही व हिंदूद्रोही लोकांसाठी आहे का? असा प्रश्न पत्रपरिषदेत प्रा. विवेक बिडवई यांनी उपस्थित केला.
हिंदू व्यक्ती, महिला आणि मंंदिरांवर हल्ले, महिलांवरील अत्याचार, साधू संतांना मारहाण यासह इतर अल्पसंख्यक समाजाला ठरवून लक्ष्य केले जात आहे. या अन्यायाच्या विरोधात जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानेे मंगळवार, 10 डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला धर्मजागरण विभागाचे क्षेत्रीय अधिकारी महेंद्र रायचुरा मार्गदर्शन करणार आहेत.
तीन मार्गांवर यज्ञाचे आयोजन
सभा स्थळी तीन मार्गांवर यज्ञाचे आयोजन केले जाणार असून, या यज्ञात आहुती टाकून बांगलादेश येथील अत्याचारात हत्या झालेल्या हिंदूंच्या आत्म्त्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करा, सोबतच यासभेत सर्व हिंदूंनी मोेठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन प्रा. नरेंद्र देशपांडे, गोपाल खंडेलवाल, मोहन आसरकर, खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे, ज्ञानेश्वर महाराज वाघ, संजय महाराज पाचपोर, वासुदेव महल्ले, डॉ शांताराम बुटे, निकेश गुप्ता, डॉ. अभय पाटील, सुभाष जैन, गजानन नारे, अॅड. मोतीसिंह मोहता, कृष्णा शर्मा, परिमल कांबळे, मंगेश वानखडे, रामेश्वर ठाकरे, रणजीत सपकाळ, संतोष हुसे, शैलेश खरोटे, अर्चना शर्मा, उषा विरक, विनोद मनवानी, रामप्रकाश मिश्रा, मयुर शहा, अनिल गावंडे, आरती लढ्ढा, उज्ज्वला देशमुख, अर्चना मसने, बंडू नायसे, डॉ. गुरमितसिंह मल्होत्रा, गुरु सारवान, डॉ. आशिष गिर्हे यांच्यासह सकल हिंदू समाज समितीच्या वतीने करण्यात आले.
मंगळवारी 3 तास व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन
बांगलादेशात होणार्या अत्याचाराविरोधात आयोजित जनआक्रोश सभा मंगळवार, 10 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता आयोजित केली आहे. याच दिवशी शहरातील व्यावसायिकांनी दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत व्यापार आणि आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी. सोबतच या सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन देखील करण्यात आले.
..........................
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा