- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रकल्पग्रस्तांच्या वारसांतर्फे वकील
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: एम.आय.डी.सी जमीन भुसंपादन प्रकरणी प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वाढीव मोबदला रूपये तीन लाख पहिला टप्पा मंजूर केले आहे. न्यायालयात प्रकल्पग्रस्तांच्या वारसांची बाजू ॲड. कनिष्क जगताप यांनी सक्षम मांडत न्याय मिळवून दिला.
याप्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी की, बाळकृष्ण लक्ष्मीचंद दिदवानी यांची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई यांच्यामार्फत औद्योगिक क्षेत्राच्या वाढीकरीता संपादीत करण्यात आली होती. या प्रकरणी प्रकल्पग्रस्त व्यक्तींनी जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते.
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर
येथील एम.आय.डी.सी. ने रूपये सहा लाख (6,00,000/-) जमा करुन सदर प्रकरणात स्थगिती घेतली होती.
प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या वारसांच्या वतीने ॲड. कनिष्क समाधान जगताप, शिवणी यांनी या प्रकरणात न्यायालयात बाजु मांडून, वारसांना रुपये तीन लाख (3,00,000/-) पहिला टप्पा मंजुर करुन दिले. मंजूर रक्कम त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाले.
दुसरा टप्पा लवकरात लवकर जमा करण्याचे आदेश न्यायालयाने या प्रकरणात दिले आहे. या प्रकरणात ॲड. कनिष्क जगताप यांनी प्रकल्पग्रस्तांची बाजू यशस्वी मांडली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा