lavani-queen-mayuri-utekar-dj: लावणी क्विन मयुरी उतेकरनी दिलखेच अदानी जिंकले रसिकांचे मन; ‘डि जे लावणीचा कोल्हापुरी तडका’ ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  लावणी क्वीन मयुरी उतेकर हिने रविवारी (दि. 8 डिसेंबर) अकोला शहरात येवून आपल्या दिलखेच नृत्य अदांनी हजारों रसिकांचे मन जिंकले. या कार्यक्रमाला कलाप्रेमींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता.



पारस्कर टाटा मोटार शो रूम, स्टेटस लॉन, राधास्वामी डेरा समोर अकोला येथे हा धमाकेदार लावणी कार्यक्रम पार पडला.  यामध्ये मयुरीने एक से बढकर सरस नृत्य करून हजारों रसिकांना खिळवून ठेवले. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्येक गाण्यावर दिलखुलास दाद दिली.




लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांची सहकलावंत मयुरी उतेकर यांचा   लावणीचा कार्यक्रम अकोल्यात प्रथमच आयोजित केला होता. या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन अरुण गंगाधरराव रूम यांनी केले होते.



कार्यक्रमाला कैलाश प्राणजाळे, विजय भोरे, गजानन खांबलकर, धर्मा पाटील गावंडे, देवराव पाटील गावंडे, कोमल सिंग पवार, दयासिंग राठोड, राजेश पिंजरकर, सुनील बुडुकले, अंबादास नागे आदी मान्यवरांसह मोठया संख्येने रसिक मंडळी उपस्थित होती.


महाराष्ट्रात सध्या लावणीच्या दुनियेत गौतमी पाटील धुमाकुळ घालत असली तरी लावणी क्वीन मयुरी उतेकरही तिच्या तोडीस तोड आहे, हे अकोल्यातील कार्यक्रमांतून मयुरी हिने दाखवून दिले. Mayuri Utekar  सध्या प्रचंड फॉर्मात आहे. लावणी डान्सर म्हणून तिने गौतमीसोबत अनेक शो केले आहेत. 




मयुरीची इंस्टाग्रामवर फॅन फॉलोईंग मोठी आहे. सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी तिचे लावणी कार्यक्रम होत आहे. कमी वयात तिने लावणी क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अदांचे लाखो दिवाणे असल्याचे अकोल्यात आयोजित कार्यक्रमात तिने सिद्ध करुन दाखविले.  मयुरीने गाण्यांवर ठेका धरताच अनेकजन या गाण्यांवरही थिरकले. अनेक प्रेक्षकांनी तिच्या सोबत ‘सेल्फी’ काढले. मयुरीला सुद्धा प्रेक्षकांसोबत ‘सेल्फी’ काढण्याचा मोह आवरता आला नाही.

टिप्पण्या