- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मागील दोन दिवसापासून अकोला शहरात सुरू असलेलं अकोला गार्डन क्लब व महाबीज द्वारे आयोजित पुष्प प्रदर्शनीचा आज समारोप झाला. 29 तारखेला प्रदर्शन बघण्याकरिता प्रचंड गर्दी केली होती.
अकोला गार्डन क्लब द्वारे आयोजित पुष्पप्रदर्शनी मध्ये अकोला शहरातील पुष्पप्रेमी व वृक्षप्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. एक हजार पेक्षा जास्त प्रतियोगी यंदाच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. समारोपिय कार्यक्रमानंतर अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, व अकोला गार्डन क्लबच्या संस्थापक सदस्यांपैकी केदारनाथ अग्रवाल, वसंत खंडेलवाल, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बक्षीस समारंभासाठी डॉ. रणजीत सपकाळ प्रामुख्याने उपस्थित होते.
एकूण 51 विविध श्रेणीमध्ये बक्षीस दिल्या गेली. त्यापैकी प्रथम पारितोषिक (चॅम्पियन ट्रॉफी) महाबीज या संस्थेने मिळवली, तर सागर प्रधान व अनुराधा ढवळे यांना द्वितीय पारितोषिक संयुक्त रित्या दिल्या गेले.
कोकिळा पाटील व शारदा डोंगरे यांना सुद्धा बहुसंख्य बक्षीस प्राप्त झाली.
याशिवाय अतुल गणात्रा, ज्योती पोतदार, , पूजा अग्रवाल, मीना अनासाने, अमृता सेनाड, कल्पना तायडे, सायली खांडेकर, हरीश पडघन, रेणू अग्रवाल, कल्पना होणारे, माया गोटफोडे, राजेश लोहिया, रामेश्वर लाड, प्रियंका पडीगिलवार, मनोज नरुले, विनया मालू, कल्पना तायडे, शोभा अग्रवाल, शिवांगी भुतडा, हरीश पडघन, संदीप तीहीले, गजानन मालोकार, आमना समीर सय्यद यांनी बक्षीस मिळवली.
तर संस्थात्मक गार्डन या श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक शिवाजी आर्ट कॉमर्स व सायन्स कॉलेजने मिळवलं तर द्वितीय पारितोषिक प्रभात किड्स स्कूलला मिळालं.
समारोपीय कार्यक्रमाला अकोला गार्डन क्लबचे विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश पाटील मुरूमकर, माजी अध्यक्ष अजय सिंगर, उपाध्यक्ष सुधीर राठी, संजय शर्मा, सचिव वैशाली पाटील, विजय ढवळे, सुनील कवीश्वर, नरेश अग्रवाल, दिनेश पारेख, नीरज आवंडेकर, संजय आगाशे, भूषण ताजने यांच्यासह गार्डन क्लबचे इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक जयप्रकाश पाटील मुरूमकर यांनी केलं. तर पाहुण्यांची ओळख अलोक खंडेलवाल, यांनी करून दिली.
वसंत खंडेलवाल यांनी यावेळी अकोला गार्डन क्लबचा पन्नास वर्षाचा प्रवास विशद केला तर, केदारनाथ अग्रवाल यांनी ही संस्था अशीच पुढे चालत राहो असे आशीर्वाद नवीन पदाधिकाऱ्यांना दिलेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा