भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : तेरा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री लाभले आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री बनले आहेत. मुंबईत आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘देवेंद्र’पर्वाला आरंभ झाला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीला 288 पैकी तब्बल 230 जागांवर यश मिळाले आहे. या यशात भाजपचा मोठा वाटा आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळविला. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल हे जवळपास निश्चित होतं. मात्र महायुतीत अंतर्गत सुरु असलेल्या घडामोडी, तसेच राज्याचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपने घेतलेला वेळ यामुळे शपथविधीचा कार्यक्रम रखडला होता. अखेर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 13 दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. सोहळ्याला 22 राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. संत-महंतांनी देखील हजेरी लावली. तसेच क्रिकेट, सिनेक्षेत्रापासून विविध क्षेत्रातील दिग्गजांनाही कार्यक्रमाला हजेरी लावली.
देवेंद्र फडणवीस हे मुत्सद्दी राजकारणी आहेत. त्यांनी याआधी 2014 ते 2019 असे सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी योग्यपणे पार पाडून स्वत:ची क्षमता याआधीच सिद्ध केली आहे. भाजपच्या आमदारांच्या बैठकीत फडणवीसांची काल विधी मंडळ नेतेपदी निवड झाली. त्यानंतर आज संध्याकाळी साडे पाच वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत फक्त फडणवीसांच्याच नावाचा एकमेव प्रस्ताव आला आणि एकमताने फडणवीसांची निवड झाल्याची निरीक्षक विजय रुपाणी यांनी घोषणा केली होती. 132 आमदारांसह भाजपनं आतापर्यंत महाराष्ट्रातली ऐतिहासिक कामगिरी केली. भाजपचे नेतृत्व करणाऱ्या फडणवीसांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळही पडली आहे.
2014 ते 2019 पर्यंत पूर्ण 5 वर्षे फडणवीस मुख्यमंत्री होते. पुन्हा येईन म्हणत 2019 मध्ये भाजपचे 105 आमदार फडणवीसांनी निवडूनही आणले. मात्र उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले आणि फडणवीसांचं स्वप्न तुटले होते. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर 2022 मध्येही शिंदेच मुख्यमंत्री झाले. मात्र आता ऐतिहासिक विजयानंतर, फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले आहेत. आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा,’देवेंद्र’ पर्वाला सुरुवात झाली.
मुंबईत शपथ विधी सुरू असताना अकोल्यात भाजप कार्यालयासमोर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. लाडू पेढे वाटून आणि एकमेकांना भरवत आनंद व्यक्त केला. रस्त्यावर मोठा टिव्ही स्क्रीन लावून त्यावर शपथ विधी सोहळा पाहण्यात आला. कार्यक्रमाला मोठया संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अकोला भाजपा कार्यालयात आज दुपारी चार वाजता पासून एलईडी लावून थेट शपथविधी सोहळा कार्यक्रम पाहण्यासाठी भाजपाचे शेकडो कार्यकर्ते महानगर अध्यक्ष जयंत मसने यांच्या मार्गदर्शनात उपस्थित होते. यावेळी ढोल ताशे लाडू करून आनंद व्यक्त करण्यात आला. महिलांनी फुगडी खेळली. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आगे बढो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी वंदे मातरम जय श्रीराम हर हर महादेव की जय सनातन धर्म की जय गोमाता की जय सियाराम या गगनभेदी घोषणेने परिसर दूमदुमला.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक माजी नगरसेवक भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी केले. यावेळी सुहासिनी धोत्रे यांनी शुभेच्छा दिल्या.
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह लोकनायक जयप्रकाश नारायण चौक येथे सुद्धा आतिषबाजी आणि आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
खासदार अनुप धोत्रे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, किशोर पाटील विजय अग्रवाल आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात जयंत मसने यांनी जोरदार कार्यक्रम करून कार्यकर्त्यांना उत्साहीत केले .
यावेळी मंजुषा सावरकर वर्षा गावंडे अर्चना शर्मा संध्या लोहकपुरे निशा कडी साधना येवले सारिका जयस्वाल अनिता चौधरी, कृष्णा शर्मा, पवन पाडिया, दिलीप मिश्रा, सागर शेगोकार अंबादास उमाळे,जयंत मसने, अर्चना म्हसने, मंजुषा सावरकर, कृष्णा शर्मा, संजय गोटफोडे, गिरीश जोशी, पवन पाडिया,, निलेश नीनोरे, संतोष पांडे गणेश अंधारे दिलीप मिश्रा रमेश करिहार देवेंद्र देवर अर्चनाताई शर्मा सुमन गावंडे, आनंद बलोदे विनोद मनमानी, धनंजय धबाले सतीश ढगे वैकुंठराव ढोरे उखंठराव सोनवणे रवी दुतोंडे मनीष बुंदेले श्रीकांत गावंडे दिलीप भरणे वसंत मानकर सुबोध गवई मनोज शाहू लाला जोगी हर्ष चौधरी चंदू महाजन पंढरी ढोरकर जगदीश झामरे , संजय झाडोकार, नितीन गवळी, नितीन ताकवाले, अरविंद शुक्ला , डॉ. राजेश अग्रवाल अंबादास उमाळे श्रीकृष्णा चव्हाण, कपिल बुंदले, योगेश मानकर, गजानन वाडेकर, रुपेश चौरसिया राहुल चौरसिया विकी ठाकूर , विजय ठाकूर , विशाल गमे डॉ. धोत्रे, मनीषा भन्साली, जानवी डोंगरे, शिव शर्मा बाळकृष्ण टाले, डॉ. युवराज देशमुख, कृष्णा पांडे , साधना येवले, सतीश येवले , भूषण इंदोरिया आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा