- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
assault-village-servant-case-: ग्रामसेवकास मारहाण व सरकारी कामात अडथळा प्रकरणी आरोपींची निर्दोष सुटका ; कोथळी खुर्द येथील घटना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मौजा कोथळी खुर्द येथील ग्राम सेवक भिमराव घाटे यांना मारहाण व सरकारी कामात अडथळा हया प्रकरणात अकोला न्यायलयाने आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणात न्यायालयात आरोपींची बाजू ॲड. प्रवीण तायडे यांनी सक्षम मांडून आरोपींना न्याय मिळवुन दिला आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी की, बार्शिटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध क्रमांक 200/11 भारतीय दंड विधान कलम 353, 294, 223, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात ग्रामसेवक भिमराव घाटे, हे ग्राम सेवक म्हणून कार्यरत असताना रोहीदास राठोड, जगदेव भोडने, मंदा भोडने यांनी ग्राम पंचायतमध्ये मिटींगला आले तेव्हा मारहाण केली व सरकारी कामात अडथळा आणला अशा आशयाच्या तक्रारीवरुन दोषारोप पत्र दाखल झाले होते.
या प्रकरणी सरकार पक्षाने चार साक्षीदार तपासले. सदर साक्षीदारांचे साक्षीमध्ये सदर घटनेबाबत सबळ तसेच एकमेकाला पुरक असे साक्षमध्ये सरकार पक्ष घटना सिध्द करु शकला नाही. यामुळे तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. शिंदे यांनी न्यायनिर्णय देवून आरोपींची निर्दोष सुटका केली.
या प्रकरणात न्यायालयात आरोपींच्या वतीने ॲड. प्रविण तायडे, ॲड. अजय जंजाळ, ॲड. प्रशिक मोरे, ॲड. अतुल खडसे यांनी कामकाज पाहिले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा