- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
agricultural-exhibition-pdkv-akl: डॉ पंजाबराव देशमुख जयंती निमित्त राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनी; शेतकऱ्यांसाठी आनंदपर्वणी, चारशेहून अधिक दालने
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : कृषि क्रांतीचे प्रणेते स्व. भाऊसाहेब उर्फ डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 126 व्या जयंती दिनानिमित्त अकोल्यातील कृषी विद्यापीठ क्रीडांगण येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अकोला यांचे संयुक्त विद्यमाने आजपासून 29 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
आज या प्रदर्शनीला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे उद्घाटनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. आज या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनीला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भेट दिली.
या प्रदर्शनीमध्ये फळबाग, भाजीपाला, फुलशेती व वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी व अवजारे इत्यादी विभागांसोबतच राज्याचे कृषी विभाग इतर कृषी विद्यापीठे, सलग्न कृषी संस्था व शासनाच्या इतर विभागांची दालने तयार करण्यात आले आहे. शेतकरी बंधूंचे ग्रामीण विकासा संबंधी कृषी संलग्नित व्यवसाय व शेतीपूरक जोडधंदे तसेच कृषीमालाच्या प्रक्रिया उद्योगा विषयीची दालने कृषी प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
या प्रदर्शनीमध्ये 400 हून अधिक दालने असून, ही कृषी प्रदर्शनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदपर्वणी ठरणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख याप्रसंगी म्हणाले.
शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे पायपडून एका वृद्ध महीलेनी भावनिक मागणी केली.आज अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनीत राज्याच्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भेट दिली.
यावेळी माणिकराव कोकाटे यांनी विविध स्टॉल्सची पाहणी केली तर अनेक शेतकऱ्यांनी त्यांना निवेदनही सादर केली.
प्रदर्शनी पाहण्यासाठी आलेल्या एका सत्तर वर्षीय वृद्ध महिलेने कृषिमंत्री यांना पाय पडून भावनिक निवेदन दिले. या निवेदनात या वृद्ध महिलेने शेतकऱ्यांना 24 तास वीज , कापूस , सोयाबीन , तुर पिकाला योग्य भाव आणि त्यावर प्रक्रिया उद्योग उभारण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
फुलांची भव्य रांगोळी
या प्रदर्शनीत असलेल्या " फ्लाॅवर्स अँड ऑर्नामेंटल प्लान्ट " च्या प्रशस्त डोम मध्ये डॉ.पंजाबराव देशमुख यांचे चित्र दहा बाय दहा या आकारात काढलेली फुलांची रांगोळीतून साकारण्यात आली आहे. ही रांगोळी प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा