Zishan-Hussain-withdraws-akl: डॉ. जिशान हुसेन यांनी घेतली माघार; वंचित काय कारवाई करणार? याकडे लक्ष

         Dr. Zishan Hussain




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी माघार घेतली आहे.


जिशान हुसेन यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. यानंतर वंचित बहुजन आघाडीने जिशान हुसैन यांना अकोला पश्चिमची उमेदवारी दिली होती. 




जिशान हुसैन हे माजी राज्यमंत्री अजहर हुसेन यांचे सुपुत्र आहे. आता वंचित बहुजन आघाडी डॉ. जिशान हुसेन यांच्यावर काय कारवाई करते आणि अकोला पश्चिम मध्ये कोणाला पाठिंबा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


टिप्पण्या