yogi-adityanath-public-meet: योगी आदित्यनाथ यांची अकोल्यात दुसरी जाहीर सभा; उद्या राज राजेश्वर नगरीत आगमन





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बुलडोजर बाबा अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा स्थानिक क्रिकेट क्लब मैदान रेल्वे स्टेशन रोड अकोला येथे उद्या मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता होत असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे.



महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज राजेश्वर नगरीमध्ये प्रखर राष्ट्रवाद व सामाजिक दायित्व म्हणून कार्यरत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नामदार योगी आदित्यनाथ राजेश्वर नगर येत असून त्यासाठी जयत तयारी करण्यात आली आहे. महायुतीचे सर्व नेते सभा यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहे.



योगी आदित्यनाथ हे सहा दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे आले होते. अकोल्यातील त्यांची ही दुसरी सभा होणार आहे.


योगी आदित्यनाथ यांची अकोला भेट 

    file image 

ऐतिहासिक जल्लोषाची तयारी


अकोल्यातील जनतेसाठी ऐतिहासिक दिवस ठरणार आहे, कारण उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत्या 12 नोव्हेंबर 2024 रोजी अकोल्यात येऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या विशेष भेटीत ते अकोल्यातील नागरिकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करणार असून, त्यांच्या विचारांनी प्रेरीत होण्यासाठी शहरात प्रचंड उत्सुकता आहे.


योगी आदित्यनाथ हे केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे, तर संपूर्ण भारतभर हिंदू समाजात एका शक्तिशाली नेत्याचे प्रतिक म्हणून ओळखले जातात. अकोल्यातील हिंदू समाजाने त्यांच्या विचारांशी एकरूप होत, त्यांच्याविषयीचा आदर आणि निष्ठा व्यक्त केली आहे. त्यांच्या येण्याने अकोल्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रचंड गर्दी होण्याची अपेक्षा आहे.


विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी 100% हिंदू लोकसंख्येचा प्रतिसाद अपेक्षित असून, ते योगीजींच्या विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर, मुस्लिम समाजातील जवळपास 40% नागरिकांनीही त्यांच्या भाषणाबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. यावरून त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचा प्रभाव स्पष्ट होतो.




अकोल्यातील प्रत्येक नागरिक या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. योगी आदित्यनाथजींचे विचार आणि त्यांचे भाषण अकोल्याला नव्या दिशेने नेण्याचे काम करेल, असा सर्वांचा विश्वास आहे. 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज असून, हा कार्यक्रम अकोल्याच्या राजकीय इतिहासातील एक सुवर्णक्षण ठरेल.



टिप्पण्या