- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
yogi-adityanath-akola-meetng: अकोल्यात योगी आदित्यनाथ कडाडले; प्रखर वाणीने काँग्रेसवर सोडले टीकास्त्र, सभेला तरुणाईची लक्षणीय उपस्थिती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 करिता अकोल्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या प्रखर वाणीने काँग्रेसवर सडेतोड टीका केली. अकोला क्रिकेट क्लब मैदानावरील योगी आदित्यनाथ यांच्या आजच्या ऐतिहासिक सभेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसवर निशाणा साधला. तर आपण एकच गोष्टी शिकलो असून माझ्यासाठी माझा देश आणि सनातन धर्म शिवाय काही मोठ होऊ शकत नाही असल्याचं म्हणत, हैद्राबाद येथे निझामाने केलेले अत्याचार काँग्रेस लपवत असल्याची टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. खरगे जी! राग काढायचा असेल तर हैदराबादच्या निजामावर काढा. निजामाच्या रझाकारांनी तुमचे गाव जाळले होते, हिंदूंची निर्घृण हत्या केली होती, असे आदित्यनाथ भाषणात म्हणाले.
दगडफेक,अत्याचार त्याच ठिकाणी होते ज्या ठिकाणी आपण विभाजित आहोत आणि त्याच ठिकाणी कटले गेलो असल्याचे म्हणत त्यांनी पुन्हा ' एक रहोंगे सेफ रहोंगे’ चा नारा दिलाय '. तर “भारत किसीको छेडता नाही. लेकीन कोई छेडता हैं तो उसे छोडता नही” असे म्हणताच उपास्थित तरुणाईने सुरात सूर मिळावित योगींच्या या संवादाला कडाडून दाद दिली.
राम मंदिर बांधण्याचा कार्य काँग्रेस सुद्धा करू शकले असते. मात्र त्यांनी केलं नाही. काँग्रेस राम नव्हते, कृष्ण नव्हते म्हणत आमचं अस्तित्व संपविण्याचं काम करत असून, आता काँग्रेसचेच अस्तित्व संपविण्याची वेळ आली असल्याचंही योगी आदित्यनाथ म्हणाले.
हा देश कोणत्याही पक्षाचा वारसा नाही, तुमच्या पूर्वजांनी या देशासाठी आपले रक्त सांडले आहे. जातीच्या नावावर फूट पाडणारे सगळे नेते देशाशी गद्दारी करत आहेत. जे भारतात राहून भारताला शिव्या देतील. 'त्यांना' त्याच प्रवासात पाठवणार ज्याच्या 'ते' पात्र आहेत, असे योगी म्हणाले.
महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास भाजप-एनडीएवर आहे. डबल इंजिन सरकार हे जनतेसाठी फायद्याचे असते, असेही ते म्हणाले.
अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील जनतेचा प्रचंड उत्साह आणि पाठिंबा पाहून मी भारावून गेलो आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार अकोला पश्चिमचे विजय अग्रवाल, अकोला पूर्वचे रणधीर सावरकर तसेच महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केले.
सभेच्या प्रारंभी भारत माता आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. याप्रसंगी योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
कार्यक्रमांचे प्रास्तविक भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. लालाजींचे (स्व. आमदार गोवर्धन शर्मा) अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी विजय अग्रवाल यांची आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी महायुती सरकारने महिला, युवा, शेतकरी व महाराष्ट्राच्या विकासासाठी राबविलेले उपक्रम योजना बद्दलचा उल्लेख केला. तसेच काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर आपल्या विविध मुद्द्यांवरून टीका केली.
अकोला पश्चिम मतदार संघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा अकोला मनपाचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी आपल्या भाषणात, अकोला शहराकरिता 45 अत्याधुनिक सिटी बस देणार असून, अकोला पश्चिम मतदार संघाचा सर्वोतोपरी विकास करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगत, मतदानाची टक्केवारीत वाढ झाली पाहिजे, असे आवाहन मतदारांना केले. तर अकोला पूर्वचे अधिकृत उमेदवार आमदार रणधीर सावरकर यांनी देखील 100 टक्के मतदान झाले पाहिजे, असे म्हणाले. यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी युवा वर्गाने प्रचंड संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी नितीन ताकवाले आणि प्रफुल चोपडे यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला.
महायुतीचे नेते गोपीकिसन बाजोरिया, अश्विन नवले, श्रीरंग पिंजरकर, महाजन आदींनी सभेला संबोधित केले. कार्यक्रमाला आमदार वसंत खंडेलवाल, कृष्णा शर्मा, अर्चना मसने, आम्रपाली उपर्ट्वर, माधव मानकर, संजय गोटफडे, रमेश अलकरी, सागर शेगोकार, विनोद मनवानी, चंदा शर्मा, वैशाली निकम, निकेश गुप्ता, ॲड. देवाशिष काकड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या विराट सभेचे संचालन सिद्धार्थ शर्मा आणि गिरीश जोशी यांनी केले. आभार जयंत मसने यांनी मानले. सभेला महिला व युवक वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा