voting-process-akola-district-: तुमचे मत तुमचा आवाज ; अकोला जिल्हयात मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम नुसार आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7 च्या ठोक्याला मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मोठया उत्साहाने निवडणुकीच्या या राष्ट्रिय लोक उत्सवात सहभागी होत आहे.


अकोला जिल्‍ह्यातील 28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला (पश्चिम), 31-अकोला (पूर्व) व 32-मुर्तिजापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघाकरीता आज मतदान घेण्यात येत आहे. अकोला जिल्‍ह्यातील एकूण 16,37,894 मतदार आज आपला मतदानाचा हक्‍क बजावत आहेत.


निवडणूक कार्यक्रमानुसार आज 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि लागलीच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी घेण्‍यात येणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असून, नागरिकांनी 100 टक्के मतदान करून आपला हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



मतदान करा









भारतीय अलंकार न्यूज 24 च्या वाचकांना आवाहन


आपका वोट, आपकी आवाज है। अपना वोट जरूर दें। 


Your Vote, Your Voice. Cast Your Vote For Sure. 


तुमचे मत तुमचा आवाज आहे। अवश्य मतदान करा। 


ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

मुख्य संपादक 

भारतीय अलंकार न्यूज 24




 






टिप्पण्या