voting-percent-16.34-akola-: अकोल्यात सकाळी 11 पर्यंत मतदानाची टक्केवारी 16.34 टक्के; राजकिय सामजिक क्षेत्रातील मंडळींनी केले मतदान करण्याचे आवाहन




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. लोकांनी सकाळी सकाळी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे. 



अकोल्यातील राजकिय, सामाजिक, पत्रकारिता, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनीही मतदानाचे कर्तव्य बजावले असून सोशल मीडियावर फोटो शेअर करत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.



दरम्यान अकोला जिल्हा मध्ये सकाळी सात ते नऊ  वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 6.08 टक्के झाली. तर अकरापर्यंत मतदानाची टक्केवारी 16.34 टक्के वाढली. मतदानाकरिता नागरीक उत्स्फूर्त येत आहेत. दुपारनंतर मतदानास वेग येईल, अशी आशा आहे.




अकोला जिल्ह्यात मतदानासाठी एकूण 1741 मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये 29 संकल्पना आधारित आदर्श मतदान केंद्र सुद्धा आहेत.



अकोला शहरातील अकोला पूर्व मतदार संघातील सीताबाई कला महाविद्यालय येथे 'पिंक मतदान केंद्र’ ची उभारणी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे हे मतदान केंद्र महिला संचालित आहे. या ठिकाणी  मुख्याधिकारीसह सर्व कर्मचारी महिला आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी या प्रकारचे विविध आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. मोठ्या उत्साहात मतदारांनी या ठिकाणी मतदान केलं.



दरम्यान खासदार अनुप धोत्रे, माजी आमदार तथा शिवसेना नेते गोपिकिसन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, अकोला पश्चिम उमेदवार विजय अग्रवाल, पत्रकार संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, वरीष्ठ पत्रकार जयेश जगड, सामजिक कार्यकर्ते जावेद जकारीया आदींनी मतदान केंद्रात जावून मतदानाचा हक्क बजावला. 


राष्ट्राच्या उज्वल भविष्यकरिता नागरिकांनी 100 टक्के मतदान करावे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले आहे.



टिप्पण्या