VBA-akola-east-election-2024: ॲड. आंबेडकर यांना पाहताच केंद्र अधिकाऱ्यांना भरली धडकी …पुढे काय घडलं वाचा




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आज 20 नोव्हेबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अकोला पुर्व विधानसभा मतदार संघातील कृषी नगर लगत असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील बुथ क्र. 223 या मतदान केंद्रावर ॲड. आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी आपले मतदान केले.




यावेळी मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी "आपल्याला पाहून मला धडकी बसली", असं वक्तव्य करत हसू पिकविला. यावर प्रकाश आंबेडकर यांनी, "तुम्हाला गोळी देऊ का", असं म्हणताच येथे हास्याचे फवारे उडाले. 



दरम्यान, राज्याच्या राजकारणात या निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीच्या रूपानं आंबेडकरांनी तिसरी ताकद निर्माण करत ‘एकला चालो रे’ ची भूमिका घेतली आहे. 


याप्रसंगी ॲड.आंबेडकर यांनी  प्रसार माध्यमांशी संवाद साधत, मतदारांनी आयाराम गयाराम लोकांना मतदान देण्यापेक्षा स्थिर सरकार येईल, याकडे भर देऊन मतदान करावे, असे आवाहन  केले. 



सत्ता स्थापनेत वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचा पुन्हा उल्लेख करीत, दोन राष्ट्रीय पक्ष बाजूला होऊन लहान पक्षांचे वर्चस्व राहणार असल्याचेही ते म्हणाले.






टिप्पण्या