spirituality-shri-ram-katha-30: हभप संजय महाराज पाचपोर यांच्या सुमधुर वाणीमध्ये 30 नोव्हेंबर पासून श्रीराम कथाचे आयोजन





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सत्य, प्रामाणिकता, विनम्रता, त्याग आणि निरपेक्षता या सर्व बाबींना उजागर करण्याच्या हेतूने येत्या 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत श्रीराम कथेचे आयोजन अग्रवाल फार्म हाऊस, बाराखोली, गायगाव रोड, अकोला येथे केले आहे.


सुप्रसिद्ध कथावाचक हभप संजय महाराज पाचपोर यांच्या सुमधुर वाणीमध्ये भाविकाना श्रीराम कथेचा लाभ घेता घेणार आहे. कथेसाठी बाराखोली येथील अग्रवाल फार्म हाऊस परिसरात सभामंडप उभारण्यात आला आहे. जेथे भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध राहतील. कथेची वेळ दुपारी 2 ते सायंकाळी 5 राहणार आहे. 



संजय महाराज पाचपोर हे कीर्तन,  श्रीराम कथेच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रबोधन, राष्ट्रभक्ती, धर्म जागृती आणि व्यसनमुक्तीसाठी अविरतपणे कार्य करत आहेत. त्यांच्या अमृतमयी वाणीतून रामकथेचे आयोजन डॉ. मनोज रामबिलास अग्रवाल यांनी केले आहे. 



डॉ. मनोज अग्रवाल हे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असून अंदूरासारख्या छोट्यागावात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. रुग्णवाहिका, सामूहिक विवाह सोहळा, अन्नदान, यासारखे अनेक उपक्रम ते अविरतपणे राबवित असतात. त्यांनी आयोजित केलेल्या या रामकथेमुळे गायगाव परिसर व पंचक्रोशीतील भाविकांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. 



6 डिसेंबर रोजी कथेचे समापन होईल. यादिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुमारे 50 बॉटल रक्त जमा करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. दुपारी 1 वाजतापासून महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांनी मोठया संख्येने  या रामकथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 



टिप्पण्या