- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
shivsena-bjp-yogi-aaditya-nath: योगी आदित्यनाथ यांच्या सभेत शिवसेना (ठाकरे) पदाधिकारीचा भाजपात जाहीर प्रवेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: योगी आदित्यनाथ यांच्या सभेमुळे मंगळवार 12 नोव्हेंबर हा दिवस पश्चिम विधानसभा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला. सभा स्थळी हजारों लोकांच्या साक्षीने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख नितिन ताकवाले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या विशेष प्रसंगी भाजप प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पश्चिम विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील आणि महानगर अध्यक्ष जयंत मसने उपस्थित होते.
नितिन ताकवले यांनी आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट करताना भाजपाच्या नेतृत्वाखालील प्रगतीशील विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि स्थानिक नेतृत्वाची दूरदृष्टी ही देशाच्या आणि पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
विजय अग्रवाल यांनी ताकवाले यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, ताकवाले यांच्या प्रवेशामुळे भाजपाला पश्चिम मतदारसंघात नवी ऊर्जा मिळेल. त्यांनी ताकवाले यांच्या राजकीय अनुभवाचा उपयोग भाजपाच्या विजयासाठी होईल, असेही नमूद केले.
खासदार अनुप धोत्रे आणि आ. रणधीर सावरकर यांनीही पक्षाच्या धोरणांवर विश्वास दाखवून पक्ष वाढीबद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रवेशामुळे भाजपाची संघटना अधिक मजबूत झाली असून, महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांना प्रचंड पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भाजपाचा प्रत्येक निर्णय प्रभावी ठरेल, अशी चर्चा सभा स्थळी होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा