- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आरोपी तर्फे ॲड. प्रफुल सुरवाडे
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: उमरी परिसरात 26 नोव्हेंबर रोजी घडलेल्या दरोडा प्रकरणातील आरोपी आशिष ठाकरे याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजुर केला असून, आज त्याची अटी व शर्तीवर पोलीस कोठडीतून सुटका करण्यात आली आहे.
उमरी परिसरामध्ये 26 नोव्हेंबर 2024 रोजी घडलेल्या एका दरोडा प्रकरणात पोलीस स्टेशन सिविल लाईन अकोला यांनी भारतीय न्याय संहिताचे कलम 309 नुसार अपराध क्रमांक 543 /2024 दाखल करून आरोपी आशिष ठाकरे (रा . मोहता मिल चाल अकोला) याला 24 तासाच्या आत मध्ये अटक केली होती. पोलीस स्टेशन सिविल लाईन्स यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलीस स्टेशन सिविल लाईन मध्ये रिमांड मधे ठेवण्याचे 27 नोव्हेंबर 2024 रोजी आदेश केला होता. तेव्हापासून आरोपी पोलिसांच्या रिमांड मधे होता.
दरम्यान आरोपी तर्फे मुख्य न्याय दंडाधिकारी अकोला यांच्या न्यायालयात वकील प्रफुल सुरवाडे यांच्यामार्फत आरोपीचा जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने आरोपीचे वकील प्रफुल सुरवाडे व सरकारी वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला केला. तसेच आरोपीची पोलीस कोठडीतून सुटका करण्याचे आदेश आज 29 नोव्हेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला यांना दिले. या आदेशान्वये आरोपीची कोठडीतून सुटका करण्यात आली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा