- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
polling-station-akola-west-con: कुलुप तोडून मतदार केंद्रात कर्मचाऱ्यांनी मिळविला प्रवेश; अकोला पश्चिम मधील प्रकार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्या पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी अकोला मधील पाचही मतदार संघातून मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
मतदान साहित्य घेऊन नियुक्त कर्मचारी आपल्या नियोजित स्थळावर पोहोचायला सुरुवात देखील झाली आहे. मात्र अकोला पश्चिम मतदार संघातील गुरुनानक विद्यालय येथे नियुक्त कर्मचारी पोहोचल्यावरही त्यांना मतदान केंद्र उघडण्याची वाट पहावी लागली आहे.
या शाळेत सर्व मतदानाच्या खोल्यांना कुलूप लावण्यात आले आहे. मात्र शाळा प्रशासनाने अद्यापही शाळा निवडणूक विभागाच्या ताब्यात दिली नाही. त्यामुळे या ठिकाणी गोंधळ उडाल्याचा पाहायला मिळला.
सरते शेवटी निवडणूक अधिकाऱ्यांनी एका खोलीचे कुलूप तोडून प्रवेश मिळविला. सध्या परिस्थिती सुरळीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा