paramilitary-force-akola-elect: निवडणुकसाठी अकोला येथे अर्ध सैन्यबलाच्या 8 तुकडया दाखल



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: संपुर्ण महाराष्ट्रात निवडणुक प्रकीया सुरू असुन 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आचार संहिता लागु करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने अकोला जिल्हयात निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडण्याकरिता अकोला पोलीस दल सज्ज झाले असून, निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी बाहेरील अर्ध सैनिक बल B.S.F., CRPF. ITBP, तसेच पंजाब पोलीस (P.S.A.P) असे एकुण 8 कंपनी विधानसभा निवडणुक बंदोबस्त करीता अकोला पोलीस घटकामध्ये हजर झाले. त्यामध्ये अंदाजे एकुण 650 अधिकारी व जवान असुन एक महिला CRPF कंपनीचा देखील समावेश आहे.


15 ऑक्टोंबर पासुन अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयात निवडणुक अनुषंगाने विविध कारवायांसह रूटमार्च, पायी गस्त, नाकाबंदी चालु आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया भयमुक्त व शांततेत पार पडावी याअनुषंगाने अकोला पोलीसांव्दारे सदर अर्धसैनिक बलासोबत जिल्हयात शहरी व ग्रामीण भागात आता पर्यंत एकुण 84 रूटमार्च काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर पोलीस स्टेशन स्तरावर हद्दीतील संवेदनशील भागात पायी पेट्रोलिंग, नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये देखील अर्ध सैनिक बलाचा समावेश होता. अर्धसैनिक बलाचे विधानसभा निवडणूक बंदोबस्तसाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे.



जिल्हयात अकोला पोलीसांकडुन अकोला शहर उपविभागात 34, अकोट उपविभागात 14, मुर्तिजापुर - उपविभागात - 19 आणि बाळापुर उपविभागात 17 असे एकुण 84 रूटमार्च घेण्यात आले.  


अकोला शहर आणि अकोट शहर येथे मोठया प्रमाणात रूटमार्च घेण्यात आला असुन त्यामध्ये बच्चन सिंह पोलीस अधीक्षक, अकोला यांच्यासह अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभाग व अकोट शहर उपविभाग तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, अर्धसैनिक बलासह RCP. QRT यांचा समावेश होता. त्याचबरोबर शहरी व ग्रामीण भागात पोलीस स्टेशन स्तरावर स्थानिक पोलीसांकडुन व अर्धसैनिक बलाकडुन पायी गस्त, नाकाबंदी करण्यात येत आहे.


निवडणुक बंदोबस्त करीता बाहेरून आलेल्या अर्ध सैनिक बलाच्या राहण्यास ठिकाण व मुलभुत सुविधेबाबत अकोला पोलीसांकडुन व्यवस्था करण्यात आली असुन त्याबाबत वरिष्ठांकडुन खात्री करण्यात आलेली आहे. 



अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे हस्ते दिवाळी सणानिमीत्त फराळ वाटप करण्यात आले. तसेच दिवाळी सण त्यांना घरी साजरा करता आला नाही म्हणून दिवाळीच्या पुर्व संध्येला पोलीस मुख्यालय, अकोला येथे दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करून दिवाळी सणाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या. अर्ध सैनिक बलाला एक दिवाळी भेट देऊन एक वेगळा पायंडा मांडला, त्या बद्दल सर्व अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस अधीक्षक यांचे आभार मानले. 



निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता सर्वोतपरी अकोला सज्ज झाला आहे. भयमुक्त वातावरणामध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडण्या अकोला पोलीस सतर्क आहे. कोणताही अनुचित प्रकार आढळुन आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करावा तसेच पोलीस हेल्पलाईन नं 112 वर संपर्क साधावा. असे आवाहन अकोला पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या