narendra-modi-sankalp-sabha: पंजाबराव कृषी विद्यापीठ मैदानावर नरेंद्र मोदींची "वऱ्हाड महाविजय सर्वस्पर्शी संकल्प सभा" भव्य यशस्वी





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मैदानावर 9 नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची विशाल जनसभा मोठ्या उत्साहात पार पडली. सभेत नरेंद्र मोदींनी आपल्या प्रखर शैलीत विरोधकांवर टीका केली आणि भाजप सरकारच्या विकास कामांवर भर दिला. नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादाने सभेला एक वेगळी ऊर्जा मिळाली.


आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी देशभरातील विकासकामे आणि महिला, युवक, तसेच वृद्धांसाठी राबवलेल्या योजनांचा सविस्तर उल्लेख केला. तीन कोटी नवीन घरे बांधण्याचे आश्वासन देताना, त्यांनी भाजपच्या सामाजिक बांधिलकीवर जोर दिला. त्यांनी काँग्रेसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राजकीयदृष्ट्या दूर ठेवण्याचा आरोप केला आणि संविधानाच्या पायमल्लीबाबत उदाहरण म्हणून जम्मू-काश्मीरचा दाखला दिला. भाजपने डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान करणे आणि त्यांच्या पंचतीर्थांच्या ठिकाणी स्मारक उभारणे हे डॉ. आंबेडकर यांना दिलेल्या सन्मानाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.


मोदींनी काँग्रेसवर जातीय फूट पाडण्याचे राजकारण केल्याचा आरोप केला, तर भाजपने नेहमीच SC, ST, OBC समुदायांसाठी काम करत त्यांच्या प्रगतीला गती दिली असल्याचे नमूद केले. "महाआघाडी म्हणजे महाघोटाळे, भ्रष्टाचार आणि राजघराण्याचे ATM," असे म्हणत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली, तर "महायुती म्हणजे गती आणि प्रगती" असे स्पष्ट केले.


विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलताना त्यांनी भाजप सरकारने पाण्याच्या गंभीर प्रश्नाचे समाधान करण्यासाठी उचललेल्या पावलांवर प्रकाश टाकला. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असून विदर्भातील शेती क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


तसेच, मोदींनी 70 वर्षांवरील नागरिकांसाठी 5 लाखांपर्यंत विमा योजना, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, आणि प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या भाषणातून भाजपच्या विकासनिष्ठ धोरणांचे दर्शन झाले.



मोदींच्या या स्फूर्तीदायक भाषणाला वऱ्हाडातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यांच्या उत्साहाने संपूर्ण सभास्थळ भारावून गेले, ज्यामुळे वऱ्हाडातील भाजपच्या विजयाचा मार्ग अधिक स्पष्ट झाल्याचे जाणवले.




यावेळी मंचावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. प्रफुल्ल पटेल, केंद्रीय समाजकल्याण मंत्री ना. रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, शिवसेना नेते माजी मंत्री ना. आनंदराव अडसूळ, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, भाजपा खासदार अनुप धोत्रे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ संजय कुटे, चैनसुख संचीती, राष्ट्रीय कॉंग्रेसचे आ. अमोल मिटकरी, आ. वसंत खंडेलवाल, श्रीरंग पिंजरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महायुतीचे उमेदवार माजी महापौर विजय अग्रवाल, आ आकाश फुंडकर, आ. हरीश पिंपळे, बळीराम सिरस्कार,  श्याम खाडे, सुनील अवचार, संदीप पाटील, अश्विन नवले, माधव मानकर, महानगर अध्यक्ष जयंत मसने, विनोद मनवानी , देवाशिष काकड, कृष्णा गोवर्धन शर्मा, सागर शेगोकार, तुषार भिरड आदी मंचावर उपस्थित होते. 

टिप्पण्या