mva-manifesto-publish-akl-: महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित; स्वाभिमानी महाराष्ट्राची नांदी!




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर जनतेला 25 लाख रुपयांचा विमा, वर्षाला 500 रुपयांत सहा गॅस, तसेच महालक्ष्मी योजनेतून महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देणार असे आश्वासन महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.



मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, खासदार अभिषेक मनु सिंघवी, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मविआचे प्रमुख नेते उपस्थित होते.



यावेळी खरगे यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनामा महाराष्ट्रनामा मधील आश्वासनं वाचून दाखवली.



महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर कंत्राटी भरती रद्द करणार असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तसेच ⁠300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत, दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन, महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार, एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार, महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार, अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार, बार्टी, महाज्योती, सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार, सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट, 2.5 लाख नोकरभरती, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती, जातीनिहाय जणगणना तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.




महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिल्या 100 दिवसांत महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये देणार. महिलांना बसचा मोफत प्रवास, सहा गॅस सिलेंडर 500 रुपयांना, जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला 18 वर्षानंतर 1 लाख रुपये देण्यात येणारं असल्याचे जाहीरनाम्यात नमूद केलं आहे.


सर्व समाज घटकांच्या सर्वांगीण विकासाचा हा महाराष्ट्रनामा स्वाभिमानी महाराष्ट्राची नांदी आहे. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हे महाविकास आघाडीचे व्हिजन आहे. महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


या पत्रकार परिषदेचे सर्व जिल्हयात थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. अकोला जिल्हा व महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक पत्रकारांना या लाईव्ह पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. स्थानिक हॉटेल मध्ये यासाठीचे आयोजन केले होते. मध्यप्रदेशचे माजी मंत्री तथा विधानसभा निवडणूक 2024 पश्चिम विदर्भ निरिक्षक कमलेश्र्वर पटेल, काँग्रेस कमिटी अकोला महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे, अ.जा. वि. महाराष्ट्र प्रदेश महासचिव महेन्द्र गवई, कपिल ढोके आदी याप्रसंगी उपास्थित होते.





टिप्पण्या