ठळक मुद्दे
मूर्तीजापूर भाजपा उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ मूर्तीजापूर, अकोला येथे भाजपा जाहीर सभा
हरिभाऊंच्या मागे हा देवाभाऊ उभा आहे..!
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मूर्तीजापूर भाजपा उमेदवार हरीष पिंपळे यांच्या प्रचारार्थ मूर्तीजापूर, अकोला येथे 13 November रोजी भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी विराट संख्येत उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. मूर्तीजापुरात हरीषभाऊ मारणार विजयाचा चौकार..!हरिभाऊंच्या मागे हा देवाभाऊ उभा आहे.. असे ना. फडणविस म्हणाले.
आपल्या हरीषभाऊ उर्फ हरिभाऊंकरता आशीर्वाद मागण्यासाठी आपल्याकडे आलो आहे. हरिभाऊ म्हणजे मूर्तीजापूरची बुलंद तोफ! आपल्या मतदारसंघाचा अनुक्रमांक 32 आहे, त्याच 32-मूर्तीजापूर मतदारसंघात ₹3,250 कोटींचा निधी हरिभाऊंनी आणला. आता चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत, आणि त्यांचे कमळाचे बटण देखील 4 आहे, ते इथून विजयाचा चौकार मारतील, असा निश्चित विश्वास आहे, असे फडणवीस यांनी म्हंटले.
खरं म्हणजे, हरिभाऊंनी या भागात अनेक विकासकामे केलेली आहेत. ₹700 कोटींची सुधारित मान्यता असलेले उमा बॅरेज मध्यम प्रकल्प, विविध माती धरण बॅरेज कामे अशा प्रकल्पांमुळे संपूर्ण भागातील 18 हजार एकराला बंद नलिकेद्वारे सिंचनाचे पाणी मिळणार आहे,असे फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मंत्रानुसार, विकसित भारत घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या शेतकरी, महिला व युवा वर्गांच्या विकासासाठी महायुती सरकारने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देत,आपले महायुती सरकार समाजातील सर्व घटकांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचा विश्वास याप्रसंगी फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच येत्या 20 तारखेला मतदान करुन दाबून, आपल्या हरीषभाऊंना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन यावेळी केले.
तत्पूर्वी आमदार हरिश पिंपळे यांनी आपल्या भाषणात मुर्तिजापूर मतदार संघातील मतदारांचे आभार मानून चौथयांदा देखील आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले.
यावेळी मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विश्वास सारंग, खा. अनुप धोत्रे, आ. चित्रा वाघ, आ. वसंत खंडेलवाल, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा