- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
murtijapur-assembly-election 15 वर्षापासून मुर्तिजापूर बार्शीटाकळी मधील नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित - सुगत वाघमारे यांचे विधान
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी 34 मुद्यांची ब्ल्यू प्रिंट
शेतमाल साठवण्यासाठी संकलन केंद्र तयार करणार
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मुर्तीजापूर विधानसभेचे उमेदवार डॉ. सुगत वाघमारे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रिय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची हजारो मुर्तिजापूरकरांच्या उपस्थितीत रेकॉर्ड ब्रेक सभा पार पडली. कुरणखेड येथे ही विशाल सभा शुक्रवारी सायंकाळी पार पडली.
काँग्रेसवाले फक्त निवडणुकीपुरते सर्व धर्मियांचा विचार करतात पण अन्याय झाला कि,त्यांच्या बाजूने उभे राहत नाहीत. बाबरी मस्जिद आम्ही पाडली असं शिवसेना म्हणते मग मुस्लिम समाज बांधव त्यांनाच का मतदान करतो? मोहम्मद पैगंबराचा बिल पास करण्यासाठी जर पाठिंबा मागणं गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा 100 वेळा करू असं ठाम मत ॲड. आंबेडकर यांनी यावेळी मांडले.
डॉ.सुगत वाघमारे यांना विक्रमी मतांनी विजयी करून मूर्तिजापूर बार्शिटाकळीचा सर्वांगीण विकास करण्याची संधी द्या, असं आवाहन ॲड आंबेडकर यांनी उपस्थितांना केले.
मूर्तिजापूर बार्शिटाकळी मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार डॉ. सुगत वाघमारे यांचे यावेळी समयोचित भाषण झाले.
डॉ. सुगत वाघमारे यांनी मूर्तिजापूर बार्शिटाकळी विधानसभा मतदार संघाच्या सर्वागीण विकासासाठी 34 मुद्यांची ब्ल्यू प्रिंट तयार असून, त्यावर आधारित विकास मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकणारा असेल अशी ग्वाही दिली.
यामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतमाल ठेवण्यासाठी संकलन केंद्र तयार करणार युवकांसाठी रोजगार निर्मिती करणार मूर्तिजापूर येथे एमआयडीसी स्वच्छ पाणी अंतर्गत रस्ते आदी प्रकल्प व योजना राबविल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या 15 वर्षामध्ये सत्ताधारी आमदाराने या मतदारसंघातील नागरिकांना रस्ते, पाणी, शाळा, दवाखाने या महत्वाच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवल्याची टीका करताना मतदारांनी मूर्तिजापूर बार्शिटाकळी मतदारसंघांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान अवश्य करावे,असे आवाहनही वाघमारे यांनी केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा