- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
mah-assembly-election-24: राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत केवळ 58.22 टक्के मतदान; अकोल्याची सरासरी टक्केवारी 56.16 %, मुर्तिजापूर येथे सर्वाधिक मतदान
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीचे आज मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडी सत्ता राखण्यासाठी लढले. तर विरोधी महाविकास आघाडीने पुन्हा सत्तेत येण्यासाठी लढा दिला. मात्र सध्या राज्यातील खालावलेल्या राजकिय परिस्थितीचा परिणाम मतदानावर झालेला दिसून आला. राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत केवळ 58.22 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. उद्या पर्यंत मतदानाची निश्चित टक्केवारी कळणार. मात्र फार जास्त वाढ होणार अशी काही शक्यता नाही.
महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी सकाळी 7 वाजता पासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळी 6 वाजता निवडणुकीची सांगता होत मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत बंद झाला आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी नंतर राज्याच्या सत्तेच्या मुकुट कोणाच्या माथ्यावर चढतो हे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, आज सायंकाळी 5 वाजतापर्यंत विदर्भासह संपूर्ण राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
अकोला जिल्हा मतदान टक्केवारी (approximate)
सायंकाळी 5 वाजेपर्यंतची अंदाजे सरासरी टक्केवारी 56.16 %
अकोट - 57. 60
बाळापुर - 58.30
अकोला पश्चिम - 54.45
अकोला पूर्व - 51.23
मुर्तीजापुर (एस सी)- 60.08
एकूण 56.16
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी
अहमदनगर - 61.95टक्के,
अकोला - 56.16 टक्के,
अमरावती - 58.48 टक्के,
औरंगाबाद- 60.83 टक्के,
बीड - 60.62 टक्के,
भंडारा- 65.88 टक्के,
बुलढाणा- 62.84 टक्के,
चंद्रपूर- 64.48 टक्के,
धुळे - 59.75 टक्के,
गडचिरोली- 69.63 टक्के,
गोंदिया - 65.09 टक्के,
हिंगोली - 61.18 टक्के,
जळगाव - 54.69 टक्के,
जालना- 64.17 टक्के,
कोल्हापूर- 67.97 टक्के,
लातूर - 61.43 टक्के,
मुंबई शहर- 49.07 टक्के,
मुंबई उपनगर- 51.76 टक्के,
नागपूर - 56.06 टक्के,
नांदेड - 55.88 टक्के,
नंदुरबार- 63.72 टक्के,
नाशिक - 59.85 टक्के,
उस्मानाबाद- 58.59 टक्के,
पालघर- 59.31 टक्के,
परभणी- 62.73 टक्के,
पुणे - 54.09 टक्के,
रायगड - 61.01 टक्के,
रत्नागिरी- 60.35 टक्के,
सांगली - 63.28 टक्के,
सातारा - 64.16 टक्के,
सिंधुदुर्ग - 62.06 टक्के,
सोलापूर - 57.09 टक्के,
ठाणे - 49.76 टक्के,
वर्धा - 63.50 टक्के,
वाशिम - 57.42 टक्के,
यवतमाळ - 61.22 टक्के .
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा