- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file images
ठळक मुद्दे
राहुल गांधीने आणि प्रकाश आंबेडकर यांचा फोनवर संवाद
प्रकृतीची केली चौकशी
जानेवारीत प्रत्यक्ष भेटतील
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना फोन केला होता. या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये 31 सेकंद संवाद झाल्याची माहिती मिळाली आहे.
या दरम्यान राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांची माफी मागितली कारण, काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर आयसीयूमध्ये 5 दिवस भरती होते, त्या दरम्यान राहुल गांधीच्या काही समर्थकांनी समाज माध्यमांवर प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते. तर काहींनी वाईट चिंतीले होते.
प्रकाश आंबेडकर यांच्या निकटवर्तीयानी सांगितले की, या दरम्यान राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी तब्येत चांगली असून सध्या ते निवडणुकीचा प्रचार करत असल्याचे त्यांना सांगितले.
तसेच यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले की, पुढील वर्षी जानेवारीत ते महाराष्ट्रात येतील तेव्हा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतील.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा