clashes-zp-president-vba-acti: जिल्हा परीषद अध्यक्ष आणि ‘वंचित’ च्या कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी; अध्यक्षाच्या बंगल्यात झाला वाद!




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 मध्ये अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद असूनही वंचितचा पराभव का झाला यावर चिंतनही सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीची अकोला जिल्हा परिषदेत सत्ता आहे तर जिल्हा परिषद अध्यक्ष हे वंचित बहुजन आघाडीचे असून त्यांच्या गावात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला केवळ 99 मतं मिळाली आहे. यामुळे संतप्त वंचित कार्यकर्त्यांनी थेट अध्यक्षांच्या बंगल्यावर धावा बोलला आणि यामुळे आज दुपारी वंचित कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद अध्यक्षामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. मात्र आपण पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीला कमी मते का मिळाली, हे विचारण्यासाठी आलो असून,  जिल्हा परिषद अध्यक्षांकडून अपमानास्पद वागणूक दिल्या गेल्याचही कार्यकर्ते आकाश डोंगरेसह सर्व कार्यकर्त्यांनी म्हंटल आहे.



तर याचा जाब विचारणारे आपण कोण? मला जाब बाळासाहेब विचारतील, असे खडे बोल जिल्हा परिषद अध्यक्ष संगिता अढाऊ यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. कार्यकर्ते पूर्व परवानगी न घेता अथवा पूर्व सूचना न देता थेट बंगल्यात शिरल्याने संगीताताई अढाऊ या कार्यकर्त्यांवर चांगल्याच संतापल्या. तसेच याचे चित्रीकरण करणाऱ्या कार्यकर्त्याला मज्जाव केला.



दरम्यान,अध्यक्षांच्या बंगल्यावर जाब विचारण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांपैकी एक जीवन डिगे यांनी याआधी सुध्दा अशा प्रकारे डॉ. जिशान हुसेन यांच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले होते.



निवडणुक काळात वांचितने जाहीर केलेले अधिकृत उमेदवार डॉ जिशान हुसेन यांनी शेवटच्या टप्प्यावर माघार घेतली होती. त्यावेळी त्यांना देखील जाब विचारण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते अश्याच प्रकारे त्यांच्या घरी गेले होते. काही वेळ गोंधळही केला होता. आता या कार्यकर्त्यांवर वांचितचे वरीष्ठ नेते काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 



यावेळी जि प अध्यक्ष संगीता ताई आढाव यांना कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.



काय म्हटले आहे निवेदनात


नुकत्याच झालेल्या विधानसभा वेळी जिल्हा परिषद अकोलाच्या अध्यक्ष संगिता अढाऊ यांच्या शिवाजीनगर गावांत वंचित बहुजन आघाडीला फक्त 99 मते मिळाली तर काँग्रेस 951 मते, भाजपा 475 मते मिळाली आहे. त्या तळेगांव बु. सर्कल मधून निवडून आलेल्या आहेत. शिवाजीनगर हे गांव तळेगांव बु. मध्ये येथे हे विशेष...!



अध्यक्षाच्या गावांत वंचित मिळालेली ही मते अल्प असून ही गोष्ट खूपच लाजीरवाणी आहे. बूथनिहाय उमेदवारांना पडलेल्या मतांची आकडेवारी जाहिर झाली असता शिवाजीनगर येथे बूथ क्रमांक 104 वर काँग्रेस 535, भाजपाला 223 तर वंचितला 52 मते आहेत. बूथ क्रमांक 105 वर काँग्रेस 416, भाजपाला 252, तर वंचितला केवळ 47 मते मिळाली आहेत. एकूण मतांची बेरीज केली असता काँग्रेस 951, भाजपाला 475 तर वंचितला केवळ 99 मते मिळाली आहेत. वंचित तीन अंकी आकडाही गाठू शकले नाही.


आपल्या कडे पक्षाने राज्य मंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये आपण पालकमंत्री ह्यांचे नंतर महत्वाचे पदावर आहात. तरी आपण यांचा माहितीचा तपशिलवार खुलासा 2 दिवसात लिखित स्वरूपात द्यावा, असे निवेदनात नमूद केले आहे.

टिप्पण्या