chitra-wagh-welcomed-akola-: स्वर्णभूषण नवनियुक्त आमदार चित्रा वाघ यांचे सर्वशाखीय सुवर्णकार समाजातर्फे अकोल्यात स्वागत

ज्ञातीबांधवांची सदिच्छा भेट



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: स्वर्णभूषण, सोनार समाज कन्या, नारीशक्तीचा बुलंद आवाज, भारतीय जनता पक्षाच्या विधानपरिषद नवनियुक्त आमदार ॲड. चित्रा किशोर वाघ या  बुधवार 13 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर होत्या. यानिम्मित सर्वशाखीय सुवर्णकार समाजाच्या वतीने त्यांचे अकोला शहरात स्वागत करण्यात आले.


याप्रसंगी अकोल्यातील सर्वशाखीय व सर्वभाषिक सुवर्णकार समाजातील पदाधिकारी यांनी सिटी स्पोर्ट्स क्लब, शिवणी विमानतळ येथे पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. स्वर्णभूषण चित्रा वाघ यांच्या पुढील राजकिय व सामाजिक यशस्वी वाटचालीसाठी सर्वांनी शुभकामना केली.



अकोल्यातील ज्ञातीबांधव सुवर्णकार समाजाने भेट घेत सदिच्छा दिल्या, आणि आपुलकीने चौकशी करून आशिर्वाद दिला. यावेळी थोडा वेळ का होईना सर्वांशी मनमोकळी चर्चा झाली. समाज बांधवांनी वेळात वेळ काढत माझे कौतुक केले. अभिनंदन केले. यावेळी मारलेल्या गप्पा दीर्घकाळ लक्षात राहतील. सर्वजण आपलेपणाने आले याचे फार अप्रूप आहे. हे कौटुंबिक क्षण हा छोटेखानी कौतुक सोहळा सदैव स्मरणात राहील, असे याप्रसंगी चित्रा वाघ म्हणाल्या.


याप्रसंगी चित्रा वाघ यांनी सर्वांचे आभार मानले. समाजाच्या प्रगतीसाठी कटीबद्ध असल्याने सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली. तसेच सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.




यावेळी शैलेश खरोटे, राजेंद्र नेरकर, विलास अनासने, सोमनाथ अडगांवकर, समीर चांदवडकर, शेखर मुखेडकर, सुनील अडगांवकर,आदित्य विसपुते, प्रमोद बुटे, अरविंद तळोकार, प्रमोद भटुरकर, संजय पुरकर, ॲड. सचिन बाळापुरे, अमोल तारकस, बंडू सावरकर आदी उपस्थित होते.







भारतीय अलंकार न्यूज 24 तर्फे विधानपरिषदेच्या नवनियुक्त आमदार ॲड. चित्रा वाघ यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

file image 

  • मुख्य संपादक 

  • ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

टिप्पण्या