- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
bjp-ranjit-savarkar-hat-trick-: भाजपचे रणधीर सावरकर यांची हॅट्रिक ; स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक करीत मिळविला ऐतिहासिक विजय!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर यांनी हॅट्रिक साधली आहे. 50 हजारावर मताधिक्य मिळवत सावरकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे गोपाल दातकर यांचा पराभव केला. रणधीर सावरकर यांनी विक्रमी 1 लाख 8 हजारावर मत घेतली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने तिसऱ्या स्थानावर राहिले.
अकोला पूर्व मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा गड विक्रमी मताधिक्याने कायम राखण्यात भाजपला यश मिळाले आहे.
अकोला पूर्व मतदारसंघामध्ये 61.60 टक्के मतदान झाले होते. एकूण दोन लाख 18 हजार 811 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. अकोला पूर्व मतदारसंघात एकूण 26 फेऱ्या पार पडल्या.
पहिल्या फेरीपासूनच भाजपचे रणधीर सावरकर यांनी आघाडी घेतली होती. सव्विसाव्या फेरी अखेर भाजपचे रणधीर सावरकर यांनी एक लाख आठ हजार 619, शिवसेनेचे गोपाल दातकर 58 हजार 6 व वंचितचे ज्ञानेश्वर सुलताने यांना 50 हजार 681 मते मिळाली. भाजपने 50 हजार मतांची विजयी आघाडी मिळवित दणाणून विजय मिळविला.
अकोला पूर्व मतदारसंघात पहिले पासूनच भाजपचे रणधीर सावरकर, शिवसेना ठाकरे गटाचे गोपाल दातकर व वंचित आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांच्यात लढत मानली जात होती. मात्र, निवडणुकीमध्ये भाजपने एकतर्फी वर्चस्व कायम राखले. 2014 मध्ये भाजपचे रणधीर सावरकर सर्वप्रथम अकोला पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य घेत त्यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. यावेळेस तिसऱ्यांदा ते निवडणूक मैदानात उतरले आणि स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक करीत सावरकर यांनी अकोला पूर्व मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळविला.
कोणाला किती मते
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा