balapur-assembly-election-24: मनगटामध्ये ताकद लागते धनुष्यबाण उचलायला; एकनाथ शिंदे यांनी साधला उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : मनगटा मध्ये ताकद लागते धनुष्यबाण उचलायला, असे म्हणत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे) पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.



अकोला जिल्हा मधील बाळापूर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्या प्रचारार्थ आज वाडेगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.




' मैं एकबार कमिटमेंट करता हू तो मैं खुद की भी नहीं सूनता ' असा हिंदी सिनेमातला डायलॉग मारून एकनाथ शिंदे यांनी सभेत एकच हसू पिकविला.



काँग्रेसकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला, आता लहान मुलांसारखे का रडता म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. 



यावेळी एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर सुद्धा टीका केली. राहुल गांधी यांनी खटाखट पैसे येणार असल्याचं म्हंटल होत तर आता एकनाथ शिंदे यांनी पटापट पैसे आम्ही टाकत असल्याचं म्हंटल. तर येणाऱ्या 20 नोव्हेंबरला घरी बसून राज्य चालवणाऱ्यांना घरी बसवा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.






मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली. तिला विरोध करण्यासाठी ही काँग्रेसची मंडळी नागपूर कोर्टात गेली आहेत. एकीकडे राज्याकडे पैसे नाही म्हणायचं आणि दुसरीकडे राहुल गांधी स्वतः काल महिलांना तीन हजार रुपये देऊ म्हणाले, मग जर पंधराशे द्यायला पैसे नाहीत तर तीन हजार कुठून देणार असा सवाल यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. 


कर्नाटक आणि छत्तीसगड प्रमाणे निवडणुकीत घोषणा करायच्या आणि नंतर शक्य नाही म्हणायचे, असे विरोधकांचे महाराष्ट्रात सुद्धा तेच चालू असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. 


या भागात लाखो हेक्टरवर लिंबूचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे इथे लिंबू पिकावरील संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी माझ्याकडे करण्यात आलेली आहे. त्यामुळे आमचे सरकार पुन्हा आल्यावर इथे नक्की लिंबू पिकावरील संशोधन केंद्र सुरू करू असे बाळापूरकर नागरिकांना एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केले.




गेल्या अडीच वर्षात अनेक लोकोपयोगी योजना फक्त बंद करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. तर दोन वर्षात सर्व प्रकल्प पुन्हा सुरु करून राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम आम्ही केले. दोन वर्षात तब्बल 124 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. शेतकरी सन्मान योजनेतून 12 हजारांची मदत केली. एक रुपयात पीक विमा योजना दिली, सततच्या नुकसानीला देखील नुकसानभरपाई महायुती सरकारने दिली. शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे सरकार आहे असे याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.




टिप्पण्या