- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
baba-siddique-murder-case-: बाबा सिद्दीकी हत्या: गुजरातमधील इसमास अकोल्यातून अटक; आता पर्यंत 25 आरोपी ताब्यात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: गुजरात मधील आनंद जिल्ह्यातील पेटलाड येथील रहिवासी असलेल्या सलमानभाई इक्बालभाई वोहरा याला आज रविवारी (शनिवार 16 नोव्हेंबरच्या रात्री) बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अकोल्यातील बाळापूर उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील लोहारा येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखेने अटक केली असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. या प्रकरणात एकूण अटकेची संख्या आता 25 झाली आहे. आरोपी वोहरा याने संबंधित इतरांना आर्थिक मदत केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील पेटलाड येथील रहिवासी असलेल्या सलमानभाई इक्बालभाई वोहरा हा आपल्या सासूच्या अंत्यविधी करिता अकोल्यातील लोहारा येथे आल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलीस त्याच्या मागावर आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला रात्री 2 वाजता अटक करुन मुंबईला नेल्याचे सुत्रांनी सांगितले.
66 वर्षीय राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्वेतील निर्मल नगर भागात आमदार मुलगा जीशान सिद्दीकीच्या कार्यालयाजवळ गोळीबार करून हत्या करण्यात आली होती.
आरोपी वोहरा याने या वर्षी मे महिन्यात बँक खाते उघडले होते. या बँक खात्यातून त्याने या प्रकरणातील आरोपींना आर्थिक मदत केल्याचे समोर आले आहे. सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपी वोहराचे कृत्य समोर आले. मात्र अटक केलेल्या आरोपी सलमान भाई याने आपण आरोपींना पैसे ट्रान्स्फर केल्याचे नाकारले आहे. हे पैसे चुकून ट्रान्स्फर झाले असल्याचं त्याने सुरवातीस पोलीसांना सांगितले आहे. मात्र पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आपले अकाउंट हॅक झाला असून त्यावरून दुसऱ्या कुणी व्यक्तीने पैशाचा व्यवहार केला असल्याचा स्पष्टीकरण अटक करण्यात आलेल्या आरोपीने आता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आरोपी सलमान याने अटकेतील आरोपी गुरमेल सिंग, रुपेश मोहोळ आणि हरीशकुमार याचा भाऊ नरेशकुमार सिंग यांना आर्थिक मदत केली होती. तसेच त्याने गुन्ह्याशी संबंधित इतरांनाही मदत केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
हरियाणातील गुरमेल सिंग आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी धर्मराज कश्यप यांना हत्येनंतर लगेचच घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले होते.
उत्तर प्रदेशातील बहराइच येथून कथित मुख्य शूटर शिवकुमार गौतम याला अटक केल्यावर पोलिसांना या प्रकरणात मोठा यश मिळाले आहे.
दरम्यान या प्रकरणात अकोल्यातील अकोट येथील शुभम उर्फ शुब्बू आणि त्याचा भाऊ प्रवीण लोणकर यांचा देखील सहभाग असल्याचं निष्पन्न झाले आहे. आजच्या एका आरोपीच्या अटके मुळे परत एकदा अकोला जिल्ह्याचे नाव या प्रकरणात वर आले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा