atrocity-act-case-akola-court: बहुचर्चित ॲट्रासिटी प्रकरणातुन पंजाब देवकते यांची निर्दोष मुक्तता

             आरोपी तर्फे वकील




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महिला ग्रामसेवक सोबत गैरवर्तन करून, शासकिय कामात अडथळा आणत असल्याचा आरोप असलेल्या एका प्रकरणातून ग्राम पंचायत सदस्य पंजाबराव देवकते यांची अकोला न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयात आरोपीची बाजू ॲड. अजय वाघमारे यांनी सक्षमतेने मांडली. हे प्रकरण 2021 मध्ये अकोला जिल्हयात गाजले होते.


मौजे पांढुर्णा, ता. पातुर, जि. अकोला येथील ग्रा. पं. चे माजी सरपंच व सदस्य असलेले पंजाबराव देवकते यांचे विरूध्द सदर ग्रा.पं. चे महिला ग्रामसेवक यांनी तक्रार दिली होती. 07 एप्रिल 2021 रोजी देवकते हे ग्रा.पं मध्ये येवुन, टेबल वरील अभिलेख फाडुन टाकुन जातीवाचक शिवीगाळ करून गैरवर्तन केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली आहे, अशा स्वरूपाची तक्रार या महिला ग्रामसेवक यांनी पोलीस स्टेशन चान्नी येथे केली होती. 


प्रकरणाची हकिकत अशा प्रकारे आहे की, फिर्यादी ही 7 एप्रिल 2021 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समीती पातुर यांचे आदेशान्वये ग्राम पंचायत कार्यालय पांढुर्णा येथे कार्यालयीन चौकशी कामी हजर होते. चौकशी पूर्ण झालेनंतर सांयकाळी पाच वाजताचे सुमारास आरोपी पंजाब श्रीपत देवकते हे ग्राम पंचायत कार्यालयामध्ये आले. व तुम्ही 14 व्या वित्त आयोगाचे सर्व पैसे खाल्ले तसेच गावातील कामकाजाचे सुध्दा पैसे खाता गावातील कामकाज नीट करीत नाही, असे म्हंटले. फीर्यादी यांनी आरोपी पंजाब देवकते यांना मला  त्याबाबत कल्पना नाही, असे सांगीतले. मात्र आरोपी पंजाब श्रीपद देवकते  फीर्यादीचे अंगावर धावुन आला व जातीवाचक शिवीगाळ केली, जिवे मारण्याची धमकी देत गैरवर्तन केले. तसेच फीर्यादीचे हातातील व टेबलावरील शासकीय रेकार्ड फाडुन फेकफाक करून शासकीय कामात अडथळा केला, अशी तक्रार फिर्यादी हिने पोलीस स्टेशन मध्ये दिली होती.



फिर्यादीच्या तक्रारी नुसार पोलीस स्टेशन चान्नी यांनी 112/2021 कलम 354, 354 (ब), 353, 506 भा दं वि. सहकलम 3(2) (va), 3(1) (r) (s) अ.जा.ज.अ.प्र. सुधारीत कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला.


गुन्हयामध्ये फिर्यादीचे कलम 164 प्रमाणे न्यायालयात जबाब नोंदविण्यात आले. फीर्यादी यांचे जातीचे प्रमाणित प्रमाणपत्र हस्तगत करण्यात आले. फीर्यादी अनुसुचीत जमातीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने फीर्यादी सोबत अनैतिक वर्तन केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, गुन्हयामध्ये कलम 3(1) (w) (i) (ii) अ.जा.ज.अ.प्र. सुधारीत कायदा प्रमाणे वाढ करण्यात आली.  तसेच या गुन्हयामध्ये यातील फीर्यादी ही ग्राम सचिव ग्रामपंचायतचा कारभार पाहणारे असुन त्यांना यातील आरोपीने गैरवर्तन करून तसेच धाकदपटशा दाखवुन त्यांचे कर्तव्य करण्यास अडथळा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात कलम 3 (1) (m) अ.जा.अ.ज.अ.प्र.का. प्रमाणे वाढ करण्यात आली व नोंद घेण्यात आली होती. आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असल्याने पोलिसांनी आरोपी विरुध्द दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात न्यायादानासाठी सादर केले होते.



हे प्रकरण दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला यांचे न्यायालयात चालले. त्यामध्ये 16 नोव्हेंबर 2024 रोजी  न्यायालयाने आरोपी पंजाबराव श्रीपत देवकते यांची निर्दोष मुक्तता केली. 

न्यायालयात आरोपीची तर्फे ॲड. अजय वाघमारे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. मिनाक्षी मुळे, ॲड. प्रतुल गैरल , ॲड. स्वप्नील फुके यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या