- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-west-vba-assembly-ele: अकोला पश्र्चिम: वंचितचे अखेर ठरलंय… अपक्ष उमेदवार हरिश अलीमचंदानी यांना पाठिंबा देणार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने अकोला पश्चिम मतदार संघातून माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. कारण अकोल्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने याठिकाणी वंचित आपल्या उमेदवारापासूनच वंचित झाली होती. वंचित शेवटी कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र वंचितने काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारा विरोधात प्रखर भूमिका मांडणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं तर नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं. अखेर आज वंचित बहुजन आघाडीने हा सस्पेन्स उघड केला असून, आपला पाठिंबा भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार हरिष अलिमचंदानी यांना दिला आहे. वंचितने आपला पाठिंबा हरिष अलिमचंदनी यांना जाहीर केल्यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये होणारी अकोला पश्चिमची लढत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी आज दुपारी एक वाजता यशवंत भवन येथे पत्रकार परिषद बोलावून ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. या घोषणेमुळे अकोलाचे विशेषतः अकोला पश्चिम मतदार संघाचे राजकीय गणित प्रस्थापितांना नव्याने मांडावे लागणार आहे.
दिवाळी संपताच 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघार झाली आणि रिंगणात उमेदवार कोण असतील, याचे उत्तर मिळाले. त्यानंतर लगेच निवडणूक प्रचाराच्या फेऱ्याही सुरू झाल्या. परंतू नरेंद्र मोदी यांच्या सभेची वाट राजकिय पक्षांना होती. कारण बरेचसे गणित त्यांच्या येण्याने सोडविल्या जाणार होती. वंचित बहुजन आघाडीने अधिकृत उमेदवारी दिलेले डॉ. जिशान हुसेन यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने वंचितची गोची झाली होती. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, नरेंद्र मोदी यांच्या अकोल्यातील सभेनंतर आम्ही ठरवू, असे वंचितच्या स्थानिक नेत्यांनी म्हंटले होते. यानुसार आज जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी यांना पाठिंबा देत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा