- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-west-assembly-election: जिशान हुसेन यांच्या निर्णयामुळे अकोला पश्चिमचे गणित गडबडले; ‘वंचित’च्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड.नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्याच्या राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने आपला नामांकन अर्ज मागे घेण्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. डॉ. जिशान हुसेन यांनी माघार घेतल्याने अकोला पश्चिम मतदार संघाचे राजकीय गणित गडबडले आहे. काँग्रेस कडून तिकिट नाकारल्याने डॉ. हुसेन यांनी वंचितला जवळ केले. वंचितने देखील आपल्या परिवारातील सदस्याला डावलून बाहेरून आलेल्या या दोन दिवसाच्या पाहुण्याला उमेदवारी दिली. मात्र या पाहुण्यानी ऐनवेळी धोका दिल्याने वंचितला आता मोठा फटका बसला आहे. आता या संपूर्ण प्रकरणानंतर वंचित बहुजन आघाडी काय निर्णय घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने माजी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.खान मो. अजहर हुसैन यांचे सुपुत्र डॉ. जिशान हुसैन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित मध्ये प्रवेश करून अकोला पश्चिमची उमेदवारी मिळविली. वंचित बहुजन आघाडीने पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवारांना डावलून ही उमेदवारी झिशान हुसैन यांना दिली. मात्र नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अकोल्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला, झिशान हुसैन यांनी माघार घेत मैदानातून पळ काढला.मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून फोन आले आणि भाजपला याठिकाणी रोखण्यासाठी माघार घेतल्याच स्पष्टीकरण झिशान हुसैन यांनी दिलं आहे.
मात्र काँग्रेसने कोणत्याही प्रकारचा झिशान हुसैन यांच्यावर दबाव आणला नसल्याचं काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे यांनी स्पष्टच सांगितले.
दुसरीकडे डॉ. हुसेन यांनी माघार घेतल्यानंतर आता वंचितने थेट काँग्रेसच्या उमेदवारावरच निशाणा साधला आहे. दंगा व 302 सारख्या प्रकरणातील आरोपीच्या मागे सुज्ञ मतदारांनी जावु नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे. जमाते हिंद, जमाते इस्लामी, एमडीएफ या सगळ्यांनी राजकारण हे पक्षावरती न ठेवता ते धर्मावर घेऊन जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी नेते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला आहे. यासंदर्भात काल सायंकाळी यशवंत भवन येथे तातडीची पत्रकार परिषद वंचितने बोलाविली होती.
पत्रकार परिषदेत वंचितने जाहीरपणे काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. तर पुढील दोन दिवसात वंचित आपला पाठिंबा कोणाला देणार, या भूमिकेवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा