- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदार संघामध्ये ज्याप्रकारे घडामोडी घडल्या. त्यापाहता या मतदार संघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. सर्वाधिक चर्चिला जात असलेला हा एकमेव मतदार संघ आहे. या संघात पंचरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल, काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साजिद पठाण आणि यांना शह देण्यासाठी मैदानात उतरलेले प्रहार जनशक्तीचे अधिकृत उमेदवार डॉ. अशोक ओळंबे, अपक्ष उमेदवार हरीश अलिमचांदाणी (बंडखोर नेते भाजपा), अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा ( बंडखोर नेते शिवसेना उबाठा) या पाच उमेदवारांची सध्यातरी मतदार संघात चर्चा आहे. यासर्वांनी आपला प्रचारही आधीच सुरू केला आहे. मात्र भाजपा नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी अकोल्यात आशीर्वाद सभा झाली आणि रविवार पासून प्रचार कार्याला एकदम वेग आल्याचे दिसते.
दिवाळी संपताच 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघार झाली आणि रिंगणात उमेदवार कोण असतील, याचे उत्तर मिळाले. त्यानंतर लगेच निवडणूक प्रचाराच्या फेऱ्याही सुरू झाल्या. परंतू नरेंद्र मोदी यांच्या सभेची वाट राजकिय पक्षांना होती. कारण बरेचसे गणित त्यांच्या येण्याने सोडविल्या जाणार होती. वंचित बहुजन आघाडीने अधिकृत उमेदवारी दिलेले डॉ. जिशान हुसेन यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने वंचितची गोची झाली. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, नरेंद्र मोदी यांच्या अकोल्यातील सभेनंतर आम्ही ठरवू, असे वंचितच्या स्थानिक नेत्यांनी म्हंटले होते. मात्र अद्यापही त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
तर दुसरी कडे भाजपा मध्ये या मतदार संघाकरिता बरेचजण पाच वर्षापासून आशा लावून बसले होते. मात्र शेवटी विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे इच्छुकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान डॉ. अशोक ओलंबे यांनी बंडखोरी करीत प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करीत उमेदवारी मिळविली. तर हरीश अलिमचंदानी यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अलिमचांदाणी यांना एक कुठेतरी आशा होती की नरेंद्र मोदी यांच्या अकोला भेटीत काही चमत्कार घडेल, मात्र असं काही झालं नाही. तर अलीमचंदानी यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपने त्यांची मनधरणी केली. परंतू सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले.
हीच परिस्थिती महाविकास आघाडी मध्ये होती. काँग्रेस मध्ये जवळपास 20 जण याजागेसाठी इच्छुक होते. यातील बरेच जणांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली होती. मात्र अगदी शेवटच्या दिवशी काँग्रेसने साजीद पठाण यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे मित्र पक्षातील शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे राजेश मिश्रा यांनी या मतदार संघासाठी पाच सहा वर्षा पासून केलेली मेहनत वाया गेली. मिश्रा देखील आपल्या निर्णयावर ठाम राहून अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात उतरले.
अश्या या सर्व नाटकीय घडामोडीत पाहिजे तसा प्रचाराला सुरुवात कोणी केली नव्हती. मात्र नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर बऱ्याच जणांचे बरेचसे प्रश्न सुटल्याने, उमेदवारानी रविवारी प्रचार कार्याला नव्या जोमाने सुरूवात केली.
विजय अग्रवाल यांनी तर रविवारी एकाच दिवशी नऊ प्रभागात भेट देत सभा घेतल्या. आळशी प्लॉट, अनंत नगर, विजय नगर, मोचीपुरा, अकोट फाईल, बाळापुर रोड, ध्यानेश्वर नगर डाबकी रोड, गीता नगर बायपास रोड त्यांनी संवाद सभा घेतल्या. नागरिकांशी संवाद साधून तेथील समस्या जाणून घेतल्या. तर दुसरीकडे अलीमचंदानी यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत व्यापारी, व्यावसायिकांची भेट घेत आहेत. साजिद खान यांनी पदयात्रा काढण्यावर भर दिला आहे. एकंदरीतच अकोला पश्चिम मध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराला गती मिळाली, असे म्हणायला हरकत नाही.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा