akola-west-assembly-election: निवडणूक अधिकारी कक्षा समोरच ' तू तू मैं मैं '




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरिता आज नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार शिवसेना (ऊबाठा) चे राजेश मिश्रा आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक अधिकारी कक्षा समोरच ' तू तू मैं मैं ' झाली.


राजेश मिश्रा हे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ही निवडणूक लढत आहे.  



मिश्रा यांनी नामांकन अर्ज मागे न घेतल्याने नाराज भाजप पदाधिकारीने ' वाह हिंदुत्ववादी ' म्हणून टाळी वाजवली आणि त्यामुळे मिश्रा समर्थक भाजप पदाधिकारीच्या अंगावर धावून गेले. 



यानंतर उपस्थितांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला असल्याचे दिसत आहे.



टिप्पण्या