- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : स्वतःला अभिमन्यू म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपण अयशस्वी असल्याच कबूल केलं आहे ,असा टोला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते फडणवीस यांना लगावला आहे.
अकोला पश्चिम मतदारसंघातून प्रहारच्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार असल्याचही बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू यांनी आपल्या भाषणातून भाजपा आणि फडणवीस यांना निशाणा करून राजकीय प्रहार केले.
यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या निर्णयाचा स्वागत देखील केले. देशात धर्म, जात आणि पैसा वाढला आहे. त्याला पर्याय म्हणजे प्रहार पक्ष असल्याचं ते म्हणाले.
कष्टकरी शेतकरी हे आपल्या सर्वात जवळ असून आगामी काळात महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही आपल्याला मदत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा