akola-assembly-constituency: निकालाच्या आधीच निकाल…



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: 288 जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून, उद्या शनिवार 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ईव्हीएम मध्ये सध्या सर्वच उमेदवारांचे भाग्य बंद आहे, मात्र असं असतानाही  उत्साही म्हणा किंवा आपल्या साहेबांच्या कार्यकुशलतेवर  ठाम विश्वास ठेवणारे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी निकाला आधीच निकाल लावलेला दिसत आहे. तसे पोस्टर्स बॅनर शहरात झळकत आहेत.


अकोल्यात सध्या ' मुख्यमंत्री एकच एकनाथ शिंदे साहेब ' या बॅनर ची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक रामेश्वर पवळ यांनी शहरात हे फलक लावले आहे. तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असा विश्वास त्यांनी या फळकाच्या  माध्यमातून व्यक्त केला आहे.




दरम्यान, राज्यात कुणाची सत्ता येणार, हे पुढील काही तासात समजेल. पण त्याआधीच मुख्यमंत्री कोण, यावरून महायुतीसह महाविकास आघाडीतही दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. तर नागरिकांमध्ये निवडणुकीच्या निकालाबाबत अंदाज बांधले जात आहेत.

टिप्पण्या