Vandalism-of-office-MNS-: मनसेच्या पदाधिकारी प्रशंसा अंबेरे यांच्या कार्यालयाची तोडफोड; मनसे सैनिकांकडूनच हल्ला झाल्याचे स्पष्ट!





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करिता उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी होऊन बाद उमेदवारांची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. त्यात अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या mns अधिकृत उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचा अर्ज बाद झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा असून, आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही अंबेरे यांच्यावर केला जात आहे. त्यातूनच आज त्यांच्या कार्यालयाची तोडफोड रात्री आठ वाजताच्या सुमारास करण्यात आल्याचा प्रकार घडला असल्याचे समोर येत आहे. तर प्रशंसा अंबेरे या आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर शासकिय विश्रामगृह येथे झालेल्या हल्ला प्रकरणात देखील आरोपी असल्याचा विषय यानिमित्त परत समोर आला आहे.


अकोल्यातील डाबकी रोड भागातल्या शिवाजी नगर भाजी बाजार चौकात प्रशंसा अंबेरे यांचं संपर्क कार्यालय आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास हल्लाची घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ला झाला त्यावेळी अंबेरे कार्यालयात नव्हत्या. दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कार्यालयातील टेबल, खुर्ची आणि काचा फोडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलिस स्टेशनचा ताफा अंबेरे यांच्या कार्यालयात पोहोचला. विशेष म्हणजे अंबेरे यांचे कार्यालय डाबकी रोड dabaki road पोलीस ठाण्याच्या अगदी मागेच आहे.


अंबेरे यांनी विरोधी उमेदवारांशी हातमिळवणी करून जाणीवपूर्वक आपलं वय कमी असल्याची बाब लपवल्याचा आरोप आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडूनच केला जात आहे. BAnews24 मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून ही तोडफोड केल्याचा आरोप अंबेरे यांनी केला आहे. तर उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी अंबेरे यांच्यावर केला आहे. भारतीय अलंकार न्यूज 24


या घटनेनंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत. मात्र, आता येथील मतदारसंघात मनसेचा उमेदवार अपात्र ठरल्याने मनसैनिक व मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. 




अंबेरे यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचं कळल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शिवाजी नगराकडे धाव घेतली. मनसेचे पदाधिकारी अविनाश मुहेकर यांनीच हा हल्ला केल्याचं अंबेरे यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. BAnews24 हल्ल्यानंतर या भागात मोठा जमाव एकत्र आला होता. पोलिसांनी बंदोबस्त वाढवत गर्दीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेमुळं अकोल्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.




टिप्पण्या