tribal-akot-gopikishan-bajoria: अकोट विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचाही दावा; गोपीकिशन बजोरिया यांनी लावला कामाचा धडाका, आदिवासींना दिलेल्या अभिवचनाची पूर्तता

(all file images)




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  जिल्ह्यातील अकोट  विधानसभेच्या मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. भाजपाचे विद्यमान आमदार असूनही या ठिकाणी आता शिवसेना शिंदे गटानेही दावा केला आहे. 


भाजप सेना युती काळात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेवर होता. 2014 मध्ये युती तुटली अन सेनेचा हा मतदारसंघ भाजपनं पटकावला. भाजपच्या तिकीटावर शेजारच्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे प्रकाश भारसाकळे 31 हजारांवर मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर ते 2019 मध्ये सुद्धा दुसऱ्यांदाही निवडून आले. मात्र आता या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी सुध्दा दावा केला आहे. 




शिंदे गटाने जिल्ह्यातील पाच मतदार संघापैकी बाळापूर आणि अकोटच्या जागेवर दावा केला आहे. गोपीकिशन बाजोरिया यांनी भाजपच्या अकोट मतदारसंघात काही महिन्यांपासून कामांचा धडाका लावला आहे.  



नुकताच त्यांनी आदिवासी बहुल भागात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचा अनावरण करून आदिवासी मतदारांच मन जिंकलं आहे. त्यामुळे आता महायुतीत अकोट मतदार संघासाठी रस्सीखेच सुरू आहे.



अभिवचन पूर्णत्वास 



सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी गावांना भेटी दिल्यानंतर येथील आदिवासी बांधव मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे शिवसेना संपर्क नेते गोपीकिशन बाजोरीया यांच्या निदर्शनास आले. एक आदिवासी बांधव वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतरही त्याच्या कुटूंबियांकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने पाठ फिरविल्याचे दिसून आले. यावेळी आपादग्रस्त कुटूंबियांना तत्काळ आर्थिक तसेच जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यासह बाजोरीया यांनी आदिवासी बांधवांच्या उत्थानाचा विडा उचलला, व्याघ्र प्रकल्पामुळे विस्थापीत झालेल्या आदिवासी बांधवांना किमान हजार चौरस फुट जागेसह इलेक्ट्रीक, पाणी, घरकुल आदि सुविधा पुरविल्या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. लवकरच विस्थापीत आदिवासी बांधवांना त्यांची हक्काची घरे मिळण्याचा मार्ग सुकर झाला.विधान परिषदेत तब्बल 18 वर्षे आमदार राहील्यानंतरही त्यांचा थेट जनतेशी संबंध आला नाही. मात्र आदिवासींच्या समस्या पाहून आपण अशा जनतेची सेवा करण्यास मुकलो अशी खंत बाजोरिया यांनी व्यक्त केली होती. 

पुढे ग्राम धोंडा आखर येथे लाडक्या आदिवासी बहिणींसोबत हजारो साड्यांचे वाटप करुन रक्षाबंधन उत्सव साजरा केला. यावेळी आदिवासी समाजाचे आराध्य भगवान बिरसा मुंडा यांचा कुठेच पुतळा नसल्याची बाब गावकर्‍यांनी  बाजोरीया यांच्या निदर्शनास आणुन दिली असता, नवरात्र उत्सवाच्या पर्वावर भव्य पुर्णाकृती बिरसा मुंडा यांचा पुतळा ग्राम धोंडा आखर येथे स्थापन करण्याची ग्वाही बाजोरीया यांनी आदिवासी बांधवांना दिली. 4 ऑक्टोबर रोजी भव्य पुतळ्याचे बाजोरीया यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे  गोपीकिशन बाजोरीया यांनी आपले अभिवचन  पुर्णत्वास नेल्याचे सांगत हजारो आदिवासी बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त करीत बाजोरीया यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्धार आदिवासी बांधवांनी व्यक्त केला आहे. 


टिप्पण्या