thieves-diwali-old-city-crime-: जुने शहरात चोरांची दिवाळी; गीता नगरात चोरीची घटना उघडकीस




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गीता नगर येथील संकेत निवासला अज्ञात चोरट्यांनी निशाणा बनवून चोरी केल्याचे आज सकाळी उघडकीस आले.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे घर एका निवृत्त सैनिकाचे असल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे चार डॉक्टर मित्रांनी हे घर भाड्याने घेतले होते. दरम्यान दिवाळी सणानिमित्त तिघे मित्र त्यांच्या गावी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने घरात प्रवेश करून चोरी केली.  




प्राप्त माहितीनुसार, या चोरीच्या घटनेत भाडेकरूचे अंदाजे दीड लाख रुपये किमतीचे दागिने आणि 5000 रुपये रोख घेऊन आरोपी फरार झाले आहेत.



अकोला पोलिसांचे आवाहन 



नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घरामध्ये सिसिटीव्ही कॅमेरा लावावा. बाहेरगावी जातांना घराचे खिडक्या दरवाजे व्यवस्थित बंद करावे. आपण बाहेर जात असल्याबाबत आपले शेजारी तसेच संबंधीत पोलीस स्टेशनला माहिती दयावी. बाहेरगावी जातांना आपल्या मौल्यवान वस्तू शक्यतो घरामध्ये ठेवु नये, असे आवाहन अकोला जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

टिप्पण्या