- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
theft-case-khemka-apartment: खेमका अपार्टमेंट मधील चोरीचा पर्दाफाश ; तामिळनाडूची टोळी जेरबंद करण्यास अकोला एलसीबीला यश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: रतनलाल प्लॉट मधील खेमका अपार्टमेंट येथील चोरीचा स्थानीक गुन्हे शाखा अकोला कडून अवघ्या चार तासात पर्दाफाश झाला आहे. तामिळनाडू मधील चार आरोपींना अटक करून एकुण दीड लाख रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात एलसीबीने यश मिळविले.
21 ऑक्टोबर 2024 रोजी फिर्यादी न योगेश जुगलकिशोर बियाणी (वय 48 वर्ष रा. खेमका प्लॉट, रतनलाल प्लॉट, अकोला.) यांनी पोलीस स्टेशन रामदास पेठ, अकोला येथे रिपोर्ट दिला की, तो 21 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सहा वाजता त्याचे राहते घरातुन जिम मध्ये जाणे करीता निघाला. त्याने त्याचे घराचे दार ओढुन घेतले. कुलुप लावले नाही. त्याचे घरात त्याची पत्नी व मुले झोपलेले होते. याची पत्नी सकाळी साडे आठ वाजता झोपेतुन उठली असता, त्यांचे लक्षात आले की, घरातील तीन मोबाईल व टेबल वरील चार नग सोन्यााचे अंगठया असा एकुण दीड लाख रुपयेचा मुद्देमाल दिसला नाही. त्यावरून घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. अशा जबानी रिपोर्ट वरून पो. स्टे रामदास पेठ अकोला येथे अप.क 376/24 कलम 305 भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला येवून तपासास घेतला.
या गुन्ह्याची उकल व्हावी, याकरीता पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अकोला यांनी गुन्हयाचा समांतर तपास करण्याचे स्थानीक गुन्हे शाखा, अकोला चे स्था.गु.शा प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळेक यांना सुचित केले. पो.नि शंकर शेळके यांनी स्थागुशा येथील एक पथक नेमले. पथकास गुन्हा उघडकीस आणण्या बाबत योग्य मार्गदर्शन केले. तपास पथकाने पो. नि शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास करीत असता, त्यांना तांत्रीक विश्लेषण व गोपनिय माहीतीच्या आधारे माहीती मिळाली की, परराज्यातील लोक हे अकोट फाईल अकोला येथील भोईपुरा येथे भाडयाने राहत आहे. अशी खात्री लायक बातमी प्राप्त झाल्यावरून सदर माहीती पो.नि.सा स्था.गु.शा. अकोला यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेले माहीती प्रमाणे सदर ठिकाणी पथक गेले.
पथकास सदर घरात मुन्नीयप्पम कुप्पम (रा. युडीयाराजप्पालायम, अंबुर, थोटटालम, वेल्लोर तामीळनाडु), शिवा मुन्नीअप्पन (रा.युडीयाराजप्पालायम, अंबुर, थोटटालम, वेल्लोर तामीळनाडु), चिन्ना नारायणा ( रा. टीटी मोत्तुर, उटटरपलायम गुडीयटटम ता. थोटीथोरीयममुटटर, वेल्लोर, तामीळनाडु), व्यंकटेश नारायण शिवा (वय 35 वर्षे रा.टीटी मोत्तुर, उटटरपलायम गुडीयटटम ता. थोटीथोरीयममुटटर, वेल्लोर, तामीळनाडु) असे सांगितले.
पोलिसांना आरोपीतांचे वागणूक संशास्पद वाटल्याने त्यांना विश्वासात घेवून विचापूस केली. यावेळी त्यांनी सकाळी अकोला शहरातील अपार्टमेंट मध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचापूस केली. त्यांनी चार नग पिवळ्या धातुचे (सोन्याचे) हातातील अंगठया वजन अंदाजे 20 ग्रॅम किं. 1१,20,000/- आणि तीन मोबाईल फोन किंमत अंदाजे तीस हजार असा एकुण 1,50,000 रूपये चा फिर्यादीत नमुद केलेला 100 टक्के मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला. आरोपीतांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन रामदास पेठ, अकोला यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह , अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पो.नि शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनात सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, माजीद पठाण यांच्या सह अब्दुल माजीद, वसीमोद्दीन शेख, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, सुलतान पठाण, गोकुल चव्हाण, भिमराव दिपके, मो. अमीर, करण मानकर, अशोक सोनोने, अभिषेक पाठक, सतिष पवार, मनिष ठाकरे यांनी केली आहे.
Akola crime
Akola LCB
Akola police
bachchan Singh
Khemka Apartment
ramdas peth
Shankar Shelke
Tamil Nadu gang
Theft case
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा