st-navratri-devi-darshan-yatra : एस टी महामंडळ तर्फे भविकांसाठी विशेष नवरात्र देवी दर्शन यात्राचे आयोजन




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : नवरात्री उत्सव काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अकोला विभाग द्वारे विशेष नवरात्र देवी दर्शन यात्राचे आयोजन केले आहे. 



नवरात्र उत्सवानिमित्त भाविक भक्तांना देविचे दर्शनाकरीता राज्य परिवहन महामंडळा द्वारे विशेष नवरात्र देवी दर्शन यात्रा 5 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येत आहे. यासाठी 265 रुपये सर्वसाधारण तर जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांना 130 रुपये यात्रा शुल्क आकारले जाईल.


देवीदर्शन यात्रे मध्ये भक्तांना बाळापुर बाळादेवी, पातुर रेणुकादेवी, चिंचोली रूद्रायणीदेवी, बार्शिटाकळी कालंका माता, दोनद आसरा माता, काटेपूर्णा ढगादेवी देवीचे असे अकोला जिल्ह्यातील सहा देवींचे दर्शन करता येईल.


यात्रा बसेस जुने बस स्थानक, अकोला आगार क्र-1 येथुन सकाळी 8.30 वाजता सुटतील. भक्तांनी गैरसोय टाळण्याकरीता अकोला आगार क्र-1 येथुन सकाळी 10 ते 5 या वेळेत  आगावु तिकीट आरक्षण करून घ्यावे, असे आवाहन एस टी महामंडळ अकोला तर्फे करण्यात आले आहे. 


अधिक माहितीसाठी स्थानक प्रमुख  आर. आर. खोटरे अथवा स्थानक प्रमुख पी.बी. बुंदे यांच्याशी संपर्क साधावा.

टिप्पण्या