ravi-rathi-mtz-akl-ncp-sp-bjp: रवी राठी यांची राष्ट्रवादीला (एस पी) सोडचिठ्ठी; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाले भाजपवासी




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते रवी राठी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 


नागपुरात प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवी राठी भाजपवासी झाले.  बावनकुळे यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.  


रवी राठी यांनी यावेळी देखील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती, मात्र ती नाकारण्यात आली.




मूर्तिजापूर राखीव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने जि.प.चे माजी सभापती सम्राट सुरवाडे यांना उमेदवारी दिली आहे.  त्यामुळे निराश होऊन रवी राठी यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.



आर्णी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजू तोडसाम व मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील नेते रवी राठी यांनी आपल्या समर्थकांसह नागपूर येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे सदर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढली असल्याचे बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

टिप्पण्या