- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
prabhat-kids-day-school-akola-: मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान; अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना डॉक्टर गजानन नारे, वंदना नारे, ॲड. वल्लभ नारे ,तसेच शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पटेकर प्रभात किड्स परिवाराचे सदस्य
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2’ अंतर्गत नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये शासनाच्या सर्व निकषांची यशस्वी पूर्तता करणार्या येथील प्रभात किड्स स्कूलने 51 लाखाचे पारितोषिक प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या अभियानाचा गौरव पुरस्कार प्रदान समारंभ आज 14 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे शानदार शासकीय कार्यक्रम नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस, नरिमन पॉईंटच्या भव्य सभागृहात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी प्रभात किड्स स्कूलला हा बहुमान मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते शाळेचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे यांनी स्विकारला. त्यावेळी इंजि. अरविंद देठे, रेखा देठे, अॅड.वल्लभ नारे, प्राचार्या वृषाली वाघमारे, उपप्राचार्या अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजित जोशी, सिनिअर को-ऑर्डीनेटर, मो. आसिफ, प्रशांत होळकर, आकाश हरणे, अकोला जि.प. च्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, प्राचार्या रत्नमाला खडके प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, केंद्र प्रमुख गोपाल सुरे हे यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, शिक्षण आयुक्त डॉ. सुरज मांढरे, शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर, अमरावती विभागाचे उपसंचालक शिवलिंग पटवे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुरस्काराची रक्कम ‘वाचन प्रभात‘ ला
अकोला येथील प्रभात किड्स स्कूलला मिळालेली ही ५१ लाख रुपयांची पारितोषिकाची रक्कम "वाचन प्रभात" साठी देणगी म्हणून दिली जाणार आहे.
शासनाकडून मिळालेली ही पारितोषिकाची रक्कम प्रभात किड्स चा सामाजिक उपक्रम "वाचन प्रभात" साठी उपयोगात आणणार असल्याचे ‘प्रभात‘ चे संचालक डॉ. गजानन नारे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रभात गेल्या अनेक वर्षांपासून ‘वाचन प्रभात‘ हा उपक्रम राबवित आहे. शासनाच्या महावाचन अभियानाला पूरक ठरणारा प्रभातचा हा उपक्रम असून डॉ. नारे यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा