old city-riots-case-akola-crime: जुने शहर दंगल प्रकरणी 16 आरोपींना अटक; तिघांना 11 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत हरीहरपेठ येथे 7 ऑक्टोबर रोजी उसळलेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी 16 आरोपींना अटक केली असून यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.


काल सायंकाळी जुने शहर भागात दंगलखोरानी वाहनांचे जाळपोळ व दगडफेक करून सामाजिक वातावरण खराब केले होते. रात्र भर या भागात तणाव पूर्ण शांतता पसरली होती.  पोलिसांनी लागलीच शोध मोहिम राबवून संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. 



दरम्यान 04 गुन्हयांमध्ये एकुण 16 आरोपींना अटक करून 01 विधीसंर्घषित बालक निष्पन्न करण्यात आले आहे. 


आज 08 ऑक्टोबर रोजी 16 आरोपींना न्यायालय समक्ष हजर करण्यात आले. 16 आरोपी पैकी तीन आरोपींना 11 ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


उर्वरीत आरोपींचा स्थानीक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे विशेष पथक, पो.स्टे. जुने शहर येथील गुन्हे शोध पथक यांचे मार्फत शोध घेवुन त्यांना अटक करण्याची तजविज ठेवण्यात आलेली आहे. पो.स्टे. जुने शहर हद्दीमध्ये पोलीस प्रशासन कडुन पोलीस मुख्यालय, राज्य राखीव पोलीस बल, अकोला शहर विभागातील स्थानिक पोलीस यांचा पुरेसा बंदोबस्त लावुन शांतता निर्माण करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


अकोला शहरातील नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट ठेवु नये, अशी सुचना अकोला पोलीस दल तर्फे देण्यात आली आहे.


दरम्यान आज हरीहर पेठ भागात जन जीवन सुरळीत झाले असल्याचे चित्र आहे.

टिप्पण्या